मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर वर्षभराची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही कारवाई केली आहे. निलंबनामुळे हे दोघंही आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मिथ हा आयपीएलमधल्या राजस्थान रॉयल्सचा तर डेव्हिड वॉर्नर सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार होता. पण आता या दोन्ही टीमनी त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. 


अजिंक्य रहाणे राजस्थानचा कर्णधार


राजस्थान रॉयल्सनं अजिंक्य रहाणेची कर्णधार म्हणून निवड केली आहे. अजिंक्यला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं असलं तरी त्याला कर्णधार म्हणून याआधी आयपीएलमध्ये फारसं यश मिळालेलं नाही. अजिंक्यनं आत्तापर्यंत ४ आयपीएलमध्ये टीमचं नेतृत्व केलं आहे. यातल्या ३ मॅचमध्ये अजिंक्यच्या टीमचा पराभव झाला. 


विलियमसन हैदराबादचा कर्णधार


न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसनकडे हैदराबादच्या टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. शिखर धवन किंवा भुवनेश्वर कुमारकडे हैदराबादच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली जाईल, असं बोललं जात होतं, पण हैदराबादच्या टीमनं केन विलियमसनवर विश्वास दाखवला.