Rohit Sharma: बुधवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 31 रन्सने पराभव झाला. यावेळी सनरायझर्स हैदराबादने 277 असा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक स्कोर उभारला. याला प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सनेही चांगली फलंदाजी केली, मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. मुंबईच्या गोलंदाजांना एसआरएच्या फलंदाजांनी चांगलंच चोपलं. यावेळी मैदानात एक वेळ अशी आली की रोहित शर्मालाच कमान हातात घ्यावी लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सिझनच्या दुसऱ्या सामन्यात अत्यंत खराब कामगिरी केली होती. हैदराबाद टीमने 20 ओव्हर्समध्ये 277 रन्स केले. IPL 2024 सिझनमध्ये कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या सलग दुसऱ्या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. या सामन्यादरम्यान परिस्थिती अशी उद्भवली होती की, हार्दिकला काही समजेनास झालं. तेव्हा त्याने टीमचा माजी कर्णधार रोहित शर्माची मदत घेतली. यानंतर हिटमॅनने जबाबदारी स्वीकारून फिल्डींग सेट केली.


रोहितने हार्दिकला बाऊंड्री लाईनवर पाठवलं


मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद टीम प्रथम फलंदाजीला आली. त्यानंतर त्यांनी आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली. यावेळी अवघ्या 11 ओव्हर्समध्ये स्कोर 160 रन्सपर्यंत पोहोचला होता. यावेळी हार्दिक खूप अस्वस्थ दिसला. त्यानंतर तो रोहित शर्माचा सल्ला घेण्यासाठी गेला. यावेळी रोहितनेही कमान हाती घेत ज्याने हार्दिकलाच बाऊंड्री लाईनवर पाठवलं. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद टीमच्या डावात रोहित सतत फिल्डींग सेट करताना दिसला.



पहिल्या सामन्यात हार्दिकने रोहितला पाठवलं होतं बाऊंड्री लाईनवर


दरम्यान या सामन्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावरून चाहत्यांनी पहिल्या सामन्यात हार्दिक रोहित शर्मासोबत जसं वागला होता, तसंच वागतोय असं म्हटलंय. गुजरात विरूद्धच्या सामन्यात हार्दिकने रोहित शर्माला बाऊंड्री लाईनवर पाठवलं होतं. चाहत्यांना हार्दिकचं हे कृत्य अजिबात आवडलेलं नव्हतं. अशातच आता रोहित हार्दिक पांड्याला बाऊंड्री लाईनवर जाण्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यानंतर चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल केलं आहे.


कर्णधार आणि खेळाडू म्हणूनही हार्दिक फेल


दुखापतीनंतर बऱ्याच कालावधीनंतर मैदानात कमबॅक केलेल्या हार्दिक पांड्याला आयपीएलच्या सिझनमध्ये साजेसा खेळ करता आला नाही. यावेळी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये त्याला विशेष कामगिरी करता आलेली नाही. हार्दिकने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 4 ओव्हर्समध्ये 46 रन्स दिले. दुसरीकडे मोठ्या सनरायझर्सविरूद्ध पाठलाग करताना 20 बॉल्सचा सामना केल्यानंतर तो केवळ 24 रन्सचं करू शकला. त्यामुळे कर्णधार आणि खेळाडू म्हणून हार्दिक फेल ठरताना दिसतोय.