Kevin Pietersen: ना साई ना भरत, केपी म्हणतो `हा` खेळाडू घेणार Rishabh Pant ची जागा!
Team India, Rishabh Pant: भारताकडे ऋषभ पंतचा (Rishabh Pant) बदली खेळाडू तयार आहे. पंजाब किंग्जचा (Panjab Kings) यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माही (Jitesh Sharma) काही खास आहे असं मला वाटतं, असं केविन पीटरसन (Kevin Pietersen) म्हणाला आहे.
Kevin Pietersen On Jitesh Sharma: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा मागील वर्षी गंभीर अपघात झाला होता. गेले अनेक दिवस त्याच्यावर उपचार होत आहेत. मात्र, अजूनही ऋषभ पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे आता टीम इंडियाच्या (Team India) आगामी सिरीजसाठी ऋषभची जागा घेण्यासाठी एखादा खमक्या खेळाडूची गरज आहे. त्यामुळे आता ऋषभ पंतची जागा कोण घेणार? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता इंग्लंडचा माजी स्टार खेळाडू केविन पीटरसन (Kevin Pietersen) म्हणजेच केपीने मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाला Kevin Pietersen?
भारताकडे ऋषभ पंतचा (Rishabh Pant) बदली खेळाडू तयार आहे. पंजाब किंग्जचा (Panjab Kings) यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माही (Jitesh Sharma) काही खास आहे. मला वाटतं, जर पंत बराच काळ बाहेर राहणार असेल तर जितेश हा खेळाडू आहे जो टीम इंडियामध्ये (Team India) पंतची जागा घेऊ शकतो. शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलेल्या अवघ्या 7 चेंडूत 25 धावांची खेळी ही सामना जिंकणारी खेळी होती, असं केपी म्हणाला आहे.
आयपीएलमध्ये यंदा अनेक युवा आणि प्रतिभावान खेळाडूंनी आपली धमक दाखवली आहे. यामध्ये साई सुदर्शन याचं नाव देखील सामील आहे. साई सुदर्शनने आपल्या संयमी खेळीच्या जोरावर टीम इंडियाच्या दरवाजावर टकटक केलंय. तर दुसरीकडे ऋषभच्या अनुपस्थितीत केएस भरतला संधी देण्यात आली आहे. मात्र, केविन पिटरसन याच्या वक्तव्याने अनेकांच्या भूवया देखील उंचावल्या आहेत. तर काहींनी त्याच्या विधानाला समर्थन देखील दिलंय.
दरम्यान, फाफ डु प्लेसिसचा आतापर्यंतचा खेळ अविश्वसनीय केला. डेव्हिड वॉर्नरने शानदार खेळी केली आणि अजिंक्य रहाणेने रविवारी सीएसकेसाठी चांगली कामगिरी केली, असं म्हणत त्याने अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) कौतूक देखील केलंय. लखनऊच्या एका सामन्यात केविन पीटरसनने केएल राहुल फलंदाजी करत असताना अजब गजब विधान केलं होतं. राहुलची बॅटिंग बघण्यासाठी बोअरिंग असल्याचं केपीने म्हटलं होतं. त्यानंतर मोठा वाद पेटला होता. त्याच्यावर टीका देखील झाली होती.