20 Year Old Swimmer Claim About Neymar: पॅराग्वेची जलतरणपटू लुआना अलोन्सोला तिच्याच देशाने अचानक ऑलिम्पिकमधून हाकलवून लावलं होतं. पॅरीसमधील ऑलिम्पिकची रविवारी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी औपचारिक सांगता झाली असली तरी लुआना अलोन्सोसंदर्भातील चर्चा सोशल मीडियावर अजूनही सुरुच आहे. आता लुआना अलोन्सोने ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार ज्युनिअरचं नाव घेत अजब दावा केला आहे. 


तो माझा चाहता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमारने आपल्याला इन्स्टाग्रामवर खासगी मेसेज पाठवला होता असा दावा लुआना अलोन्सोने केला आहे. अयोग्य पद्धतीने वागत असल्याने लुआना अलोन्सोला तिच्याच देशाने ऑलिम्पिक सोडून निघून जाण्यास सांगितल्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने नेमारचं नाव घेत विचित्र विधान केलं. पॅराग्वेमधील एका रेडिओ शोमध्ये बोलताना 20 वर्षीय लुआना अलोन्सोने ब्राझीलचा माजी कर्णधार असलेल्या नेमार आपला चाहता असून त्याने आपल्याला खासगी मेसेज पाठवल्याचं म्हटलं आहे. लुआना अलोन्सोने नेमकं दोघांमध्ये काय बोलणं झालं हे मात्र सांगितलं नाही.


नेमकं काय म्हणाली ती?


"त्याने मला खासगी मेसेज पाठवून संवाद साधला होता. सध्या मी इतकेच सांगू शकेन. त्याने त्या मेसेजमध्ये मला एक विनंती केली होती, ज्याबद्दल मी इथे सांगू शकत नाही," असं लुआना अलोन्सो सांगितल्याचं वृत्त 'फॉक्स स्पोर्ट्स मॅक्सिको'ने दिलं आहे. ऑलिम्पिक व्हिलेजमधून तुला हाकलवून लावण्यात आलं अशा बातम्या समोर आल्या आहेत, असं म्हणत प्रश्न विचारला असता लुआना अलोन्सो याला चुकीची माहिती आहे असं उत्तर दिलं. मला कुठूनही कोणीही हाकललेलं नाही किंवा निंलबित केलेलं नाही. 'चुकीची माहिती पसरवू नका,' असं मी लोकांना सांगेन, असंही लुआना अलोन्सो म्हणाली. 


नक्की पाहा व्हिडीओ >> महिला कोचच्या सौंदर्य अन् Attitude ची चर्चा... भांडून मिळवलं पदक; स्वॅगवाला Video पाहाच


तिने संपूर्ण ऑलिम्पिक वादामुळेच गाजवलं


लुआनाने तिच्या वागणुकीच्या माध्यमातून 'अयोग्य वातावरण' निर्माण केल्याचा आरोप झाल्यानंतर तिच्यावर बंदी घालण्यात आल्याचं पॅराग्वेच्या ऑलिम्पिक समितीने म्हटलं होतं.  पॅराग्वेची ही 20 वर्षीय जलतरणपटू अलीकडेच झालेल्या महिलांच्या 100 मीटर बटरफ्लाय स्पर्धेमध्ये शेवटच्या स्थानावर राहिली. तिच्या कामगिरीपेक्षा तिच्या पॅरीस ऑलिम्पिकदरम्यानच्या सोशल मीडियावरील पोस्ट अधिक चर्चेत राहिल्या. पॅराग्वेच्या ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा लॅरिसा शेरर यांनी लुआना अलोन्सो राष्ट्रीय संघापासून वेगळी झाल्याच्या आणि ऑलिम्पिक व्हिलेजमधून बाहेर पडल्याच्या वृत्ताला दुजोरा देणारं एक निवेदनच जारी केलं होतं. अवघ्या 20 वर्षीय लुआना अलोन्सोने पॅरिस ऑलिम्पिक 2024 दरम्यान अचानक स्विमिंगमधून निवृत्तीची घोषणा करत एकच खळबळ उडवून दिली होती. यापुढे आपण स्विमिंगच्या खेळात सहभागी होणार नाही असं लुआना अलोन्सोने जाहीर केलेलं.  


नेमार फुटबॉल मैदानापासून दूर


दुसरीकडे सौदी प्रो लीगच्या पुढील सर्वामध्ये नेमार खेळणार नाहीये. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमधून तो सावरत असल्याने त्याने मानावर न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये नेमारला दुखापत झाली होती. त्यामुळे तो अनेक स्पर्धांपासून दूर राहिला आहे. मात्र नेमार नसतानाही अल हैलालने ही स्पर्धा जिंकली. त्यांनी 19व्यांदा ही स्पर्धा जिंकली. सौदी लीग सामान्यपणे ऑगस्टमध्ये सुरु होते. पुढील महिन्यात होणाऱ्या कोपा अमेरिका स्पर्धाही नेमारला खेळता येणार नाही.