`कोहली-कुंबळेचा वाद योग्य पद्धतीनं हाताळता आला असता`
विराट कोहली आणि अनिल कुंबळेमध्ये झालेला वाद योग्य पद्धतीनं हाताळता आला असता
कोलकाता : विराट कोहली आणि अनिल कुंबळेमध्ये झालेला वाद योग्य पद्धतीनं हाताळता आला असता, असं वक्तव्य भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं केलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक होण्यासाठी आता रवी शास्त्रीनंही अर्ज केला आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदाची चुरस आणखी वाढली आहे. याआधी सेहवाग, लालचंद राजपूत, डोडा गणेश, टॉम मूडी, रिचर्ड पायबस यांनी अर्ज केले आहेत.
अर्ज आलेल्या या खेळाडूंपैकी एकाची नियुक्ती सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांची समिती करणार आहे. मागच्यावेळी रवी शास्त्रीऐवजी अनिल कुंबळेची भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. प्रशिक्षक म्हणून नियुक्ती न झाल्यामुळे रवी शास्त्री नाराज झाला होता. आपल्या प्रशिक्षक न होण्याला सौरव गांगुलीच जबाबदार असल्याचे आरोप रवी शास्त्रीनं केले होते.