IPL 2025 : आयपीएल 2024 मध्ये केकेआरचा मेंटॉर असणारा गौतम गंभीर आता टीम इंडियाचा हेड कोच बनला आहे. हेड कोच बदलल्यावर टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये सुद्धा काही बदल झाले आहेत. पुढील काहीच महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडेल, त्याअगोदर काही टीम त्यांचे हेड कोच बदलण्याच्या तयारीत आहेत. टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा हेड कोच बनणार आहे. तर राजस्थानचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट केकेआरशी मेंटॉर म्हणून जोडले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक इंग्रजी वृत्तपत्र 'द टेलीग्राफ' ने दिलेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयल्स आणि कुमार संगकाराने त्यांच्यात असलेला कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटर कुमार संगकाराने 2021 रोजी राजस्थान रॉयल्स डायरेक्टर ऑफ क्रिकेटची पोस्ट सांभाळली होती. यावर्षी राजस्थान रॉयल्स फायनलमध्ये पोहोचली, मात्र विजेतेपद जिंकू शकली नाही. श्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटर आता आयपीएलमधील दुसऱ्या संघाशी जोडू शकतो ज्यात कोलकाता नाईट रायडर्स सर्वात पुढे आहे. 


हेही वाचा : विनेश फोगट आणि बजरंग पुनियाची राजकारणात एंट्री, काँग्रेसमध्ये आज करणार प्रवेश


 


गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच बनल्यानंतर केकेआरचे असिस्टंट कोच अभिषेक नायर आणि फिल्डिंग कोच रेयान टेन डोशेट सुद्धा टीम इंडियाशी जोडले गेले आहेत. ज्यामुळे सध्या केकेआरमध्ये तीन मोठी पद रिक्त आहेत. मात्र केकेआरचे हेड कोच चंद्रकांत पंडित हे अजूनही पदावर कायम आहेत. असं म्हटलं जातंय की आयपीएल 2025 साठी चंद्रकांत पंडितच केकेआरचे हेड कोच राहतील तर गौतम गंभीरच्या जागी कुमार संगकारा हा केकेआरचा मेंटॉर होईल. कुमार संगकारा हे राजस्थान रॉयल्सपूर्वी सनरायजर्स हैदराबादच्या कोचिंग स्टाफमध्ये राहिलेले आहेत. संगकारा कोच होण्यापूर्वी हैद्राबादकडून आयपीएलमध्ये खेळले सुद्धा आहेत. तर यापूर्वी ते पंजाब किंग्सचा सुद्धा भाग होते.