Emmanuel Macron: लाडक्या `एमबाप्पे`साठी फ्रान्सचे राष्ट्रपती थेट मैदानात; सांत्वन करत पाठीवर कौतूकाची थाप!
French President Emmanuel Macron: फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर फ्रान्सचा स्टार फॉरवर्ड खेळाडू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) याला अश्रू अनावर झाले होते. त्याला रडताना पाहून...
Fifa World Cup 2022 Final: अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात (Argentina vs France Final 2022) खेळल्या गेलेल्या फिफा वर्ल्ड कपच्या थरारक फायनल सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊट (Penalty Shootout) फ्रान्सचा 4-2 ने पराभव केला. हृदयाचे ठोके क्षणाक्षणाला वाढत असताना इमिलियानो मार्टिनेसने मेस्सीच्या (Lionel Messi) फॅन्सच्या आशा जिवंत ठेवल्या आणि 36 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती मैदानात उतरल्याचं दिसून आलं. (Kylian Mbappe consoled by French President Emmanuel Macron)
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर फ्रान्सचा स्टार फॉरवर्ड खेळाडू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) याला अश्रू अनावर झाले होते. त्याला रडताना पाहून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी थेट मैदान गाठलं आणि एमबाप्पेचं सांत्वन केलं. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एमबाप्पेला जवळ घेतलं आणि एकहाती झुंज दिल्याने त्याच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली.
अतिशय रोमांचक आणि थरारक टप्प्यात म्हणजे पेनल्टी शूट आऊटमध्ये (Thriller Match) सामना गेला. या पेनल्टी शूट आऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली. एम्बाप्पेने एकट्याच्या हिंमतीवर सामना खेचून आणला. एम्बाप्पेने आजच्या सामन्यात सर्वाधिक एकून 4 गोल केले. पहिल्या हाफमध्ये त्याला गोल करता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये त्याने 2 मिनिटात 2 गोल करत सर्वांनाच दणका दिला आणि फ्रान्सला (France) सामन्यात जिवंत ठेवलं.
पाहा Video -
दरम्यान, अतिरिक्त वेळेत देखील एम्बाप्पेने एक गोल करत मेस्सीच्या स्वप्नांना (Lionel Messi's dream comes true) सुरंग लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये पहिला गोल करत फ्रान्सच्या आशा कायम ठेवण्याचं काम एम्बाप्पेने (Kylian Mbappe) केलं. अशारितीने त्याने 4 गोल केले. तो एकटा नडला... त्याची कामगिरी पाहून राष्ट्रपतीला देखील मैदानात उतरावं लागलं. खऱ्या अर्थाने तो बाजीगर ठरलाय.