टेस्ट मॅचमध्ये शतक झळकवलं...10 विकेट्स घेणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूचं निधन
एकाच सामन्यात शतक आणि 10 विकेट्स घेण्याचा विक्रम करणाऱ्या दिग्गज खेळाडूचं निधन
मुंबई: ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटर एलन डेव्हिडसन यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डने याबाबतची अधिकृत माहिती ट्वीट करून दिली आहे. डेव्हिडसन एका कसोटी सामन्यात 10 विकेट्स घेणारे आणि शतक ठोकणारे पहिले क्रिकेटपटू म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात शोकाकुल वातावरण आहे.
1953 रोजी इंग्लंड विरुद्ध सामन्यात एशेज सीरिजमधून त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळत पदार्पण केलं होतं. 1960 मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध ब्रिस्बेन टेस्ट खेळताना त्यांनी शतक झळकवलं होतं. याच सामन्यात त्यांनी 10 विकेट्स घेण्याचा अनोखा विक्रम देखील केला होता.
डेव्हिडसन हा अनोखा विक्रम करणारे जगातिल पहिले क्रिकेटपटू ठरले. त्यावेळी त्यांची जगभरात चर्चा होती. क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर ते 5 वर्ष ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघासाठी निवड समितीमध्ये देखील सहभागी होते.
डेव्हिडसन न्यू साउथ वेल्सचे अष्टपैलू आणि लेफ्ट स्विंग गोलंदाज म्हणून ओळखले जायचे. त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी 44 कसोटी सामने खेळले. या 44 सामन्यांमध्ये त्यांनी एकूण 186 विकेट्स घेतल्या. त्याच सोबत 1328 धावा केल्या. 2011 मध्ये आयसीसीने हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता.