Lionel Messi receives death threat : फुटबॉलविश्वातून एक मोठी बातमी समोर येतेय. यामध्ये अर्जेंटीनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला (Lionel Messi) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. इतकंच नाही तर या धमकीपूर्वी त्याची पत्नी एंटोनेला रोकुजो (Antonela Roccuzzo) हिच्या कुटुंबाच्या मालकीचं असलेल्या दुकानावर गोळीबारही करण्यात आला. यावेळी गुन्हेगारांनी तब्बल 14 गोळ्या झाडल्या असल्याचं समोर आलं आहे. या गोळीबारानंतर बंदूकधाऱ्यांनी तिथे धमकीची नोट सोडली. 


मेस्सीसाठी धमकीचा मेसेज सोडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, दोन जणांनी रात्रीच्या सुमारास हा गोळीबार केला. एंटोनेलाच्या कुटुंबियांच्या दुकानावर या व्यक्तींनी गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये दुकानासमोरील काचा फुटल्या. या व्यक्तींनी यावेळी मेस्सीसाठी धमकीचा मेसेजही सोडला. या मेसेजमध्ये लिहिलंय की, “मेस्सी, आम्ही तुझी वाट पाहतोय. जावकिनही अंमली पदार्थांचा एक तस्कर आहे, त्यामुळे तो तुझी काळजी घेऊ शकणार नाही.” 


दरम्यान या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये कुणालाही दुखापत झाल्याची माहिती नाहीये. मात्र या हल्लेखोरांबाबत अजूनही काहीही माहिती मिळालेली नाही. 


मेस्सीने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार


अर्जेंटिनाला वर्ल्ड कप (FIFA World Cup) जिंकवून देणारा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने फिफा पुरुषांचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार (FIFA Best Mens Player award) पटकावला आहे. यादरम्यान त्याने फ्रेंचचा युवा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पेला (Kylian Mbappe) मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. मेस्सी आणि एमबाब्वे यांनी गेल्या वर्षीच्या फुटबॉल विश्वचषकाच्या फायनलमध्ये (FIFA World Cup Final) जोरदार लढत दिली होती. 


आगामी वर्ल्ड कपमध्ये मेस्सी खेळणार?


आगामी वर्ल्ड कपमध्ये (Will Messi play in FIFA World Cup 2026) खेळणार की नाही? असा प्रश्न विचारला जातो. मला फुटबॉल (Football) खेळायला आवडते. मी तंदुरुस्त आहे आणि खेळाचा आनंद घेत आहे पण वर्ल्ड कप अजून दूर आहे. तोपर्यंत काय होते ते पाहावे लागेल, असं मेस्सी म्हणाला होता.