बार्सिलोना : बार्सिलोनाची आणखी एक खराब कामगिरी आणि दुसर्‍या पराभवानंतर बार्सिलोनाने मुख्य प्रशिक्षक रोनाल्ड कोनमन यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. लिओनेल मेस्सीने बार्सिलोना सोडल्यानंतर तीन महिन्यांनी कोमनला बडतर्फ करण्यात आलंय. याचं कारण म्हणजे संघ बऱ्याच काळापासून संघर्ष करत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगामध्ये रिओ व्हॅलेकानोकडून 1-0 असा पराभव झाल्यानंतर बार्सिलोनाने कोमनला काढून टाकण्याची घोषणा केली. याआधी रविवारी रिअल माद्रिदनेही बार्सिलोनाचा त्यांच्या घरचं मैदान कॅम्प नाऊमध्ये 2-1 असा पराभव केला.


संघाच्या खराब कामगिरीसाठी कोमनला एकट्याला दोष देता येणार नाही, असे कर्णधार सर्जिओ बास्केट्सने सांगितलं होतं. तो म्हणाला, याला आम्ही सर्व जबाबदार आहोत. बार्सिलोनाचे सध्या स्पॅनिश लीगमधील 10 सामन्यांतून 15 गुण आहेत आणि ते नवव्या स्थानावर आहे. 


या सीझनमध्ये संघाने गमावलेल्या पाच सामन्यांमध्ये चॅम्पियन्स लीगमध्ये बायर्न म्युनिचकडून 3-0 अशा पराभवाचा सामना करावा लागला होता आहे. कोमन हे 15 महिने बार्सिलोनाचे मुख्य प्रशिक्षक होते. दरम्यान, संघाने 67 सामने खेळले त्यापैकी 39 जिंकले आणि 16 गमावले. उर्वरित 12 सामने अनिर्णित राहिले.


इंग्लिश लीग चषक फुटबॉल स्पर्धेतील मँचेस्टर सिटीची चार वर्षांची सत्ता वेस्ट हॅमकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत झाल्याने संपुष्टात आलीये. वेस्ट हॅमने उपांत्यपूर्व फेरीचा सामना 5-3 असा जिंकला. 2017-18 पासून प्रत्येक मोसमात त्यांनी या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होतं.