IND vs SA Final live Score: टीम इंडिया विश्वविजेता, फायनलमध्ये साऊथ अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

Surabhi Jagdish Sun, 30 Jun 2024-12:56 am,

IND vs SA Final live Score: टी-20 वर्ल्डकपमध्ये आज शेवटचा म्हणजेच फायनल सामना होणार आहे. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे.

IND vs SA Final live Score: T20 वर्ल्डकप 2024 चा अंतिम सामना 29 जून रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोसमध्ये रात्री 8:00 वाजता खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी एकही सामना गमावला नाही आणि आता टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या भव्य अंतिम फेरीत दोघेही आमनेसामने येणार आहेत.

Latest Updates

  • टीम इंडियासाठी सामना हातातून गेला असताना हार्दिक पांड्याने कमाल दाखवली अन् खतरनाक क्लासेनला तंबूत पाठवलं. क्लासेनने 27 बॉलमध्ये 52 धावा केल्या. सामना रोमांचक स्थितीत आहे.

  • अक्षर पटेलने टीम इंडियाला तिसरी विकेट मिळवून दिली. घातक अशा स्टब्सची दांड्या अक्षरने उडवल्या.

  • साऊथ अफ्रिकेने पावर प्लेमध्ये धमाकेदार सुरूवात केली आहे. पहिल्या 6 ओव्हरमध्ये साऊथ अफ्रिकेने 2 विकेट्स गमावून 42 धावा केल्या आहेत.

  • आफ्रिकेची सुरूवात चांगली झाली नाहीये. पहिल्या दोन ओव्हरमध्ये दोन विकेट्स गेल्या आहेत.

  • 6 ओव्हप अखेर साऊथ आफ्रीका 42 रन्सवर 2 विकेट

  • मार्कब 4 रन्स बनवून आऊट..अर्शदीपच्या बॉलिंगवर ऋषभ पंतने घेतली कॅच

  • साऊथ आफ्रीकेची पहिली विकेट

  • टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 176 धावा केल्या आहे. त्यामुळे आता साऊथ अफ्रिकेसमोर 177 धावांचं आव्हान असेल.

  • टीम इंडिया संकटात असताना मदतीला धावला तो अक्षर पटेल... टीम इंडियाचा बापू उर्फ अक्षरने 31 बॉलमध्ये 47 धावांची वादळी खेळी केली. त्यात त्याने 4 सिक्स आणि 1 फोर मारला.

  • टीम इंडियाला पावरप्लेमध्येच तिसरा धक्का बसला असून सूर्यकुमार यादव केवळ 3 धावांवर बाद झालाय. मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्याने विकेट थ्रो केली.

  • रोहितपाठोपाठ आता ऋषभ पंत देखील तंबूत परतला आहे. केशव महाराजच्या बॉलवर ऋषभचा कॅच उडाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये आफ्रिकेला दोन विकेट्स मिळाल्या आहेत.

  • टीम इंडियाला पहिला धक्का बसलाय. कॅप्टन रोहित शर्मा 5 बॉलमध्ये 9 धावा करून बाद झाला.

     

  • दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (WK), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (C), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शाम्सी.

    टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (C), विराट कोहली, ऋषभ पंत (WK), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

  • टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. संघात कोणतेही बदल केले नाहीत, असं रोहित शर्माने सांगितलं.

  • IND vs SA Final live Score: विराटवर असणार चाहत्यांचं लक्ष 

    दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताला चांगली सुरुवात हवी आहे. या सामन्यात फक्त रोहित शर्मा आणि विराट कोहली डावाची सुरुवात करताना दिसणार आहेत. हिटमॅन सध्या फॉर्मात आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने 57 रन्सची तुफान इनिंग खेळली होती. तर कोहली पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. त्याला केवळ नऊ रन्स करता आले. मात्र, कोहलीची बॅट आज तळपेल आणि तो मोठी खेळी खेळू शकेल, असा विश्वास इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार आणि प्रशिक्षकाने व्यक्त केला.

  • IND vs SA Final live Score: भारत-दक्षिण आफ्रिका हेड-टू-हेड

    टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर वरचष्मा आहे. या दोघांमध्ये एकूण 26 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 14 आणि दक्षिण आफ्रिकेने 11 जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला. T20 विश्वचषकातही भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व आहे. दोन्ही संघ सहा वेळा आमनेसामने आले आहेत ज्यात भारताने चार सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकले आहेत. 

  • IND vs SA Final live Score: फायनलसाठी कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11

    रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैयस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.

  • IND vs SA Final live Score: शिवम दुबेचा पत्ता होणार कट?

    या T20 वर्ल्डकपमध्ये शिवम दुबेची आतापर्यंतची कामगिरी काही खास नाही. अशा स्थितीत त्याचे अंतिम फेरीतील स्थान धोक्यात आले आहे. आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या संजू सॅमसनचा भारताकडे चांगला पर्याय आहे. आता रोहित हा कठोर निर्णय घेणार का की कोणताही बदल न करता अंतिम फेरीत प्रवेश करणार हे पाहावं लागणार आहे

  • IND vs SA Final live Score: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजी अटॅक

    गोलंदाजीच्या बाबतीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात फारसा फरक नाही. भारताने स्पर्धेत 15.21 च्या सरासरीने आणि 6.42 च्या इकॉनॉमी रेटने 56 विकेट्स घेतले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने या कालावधीत 15.23 च्या सरासरीने आणि इकॉनॉमी रेटने 59 विकेट्स घेतले आहेत.

  • IND vs SA Final live Score: सामना खेळपट्टी क्रमांक 4 वर होणार 

    भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना बार्बाडोसच्या खेळपट्टी क्रमांक 4 वर होणार आहे. या खेळपट्टीवर दोन सामने खेळले गेले, ज्यामध्ये एका सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला, तर दुसरा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही.

  • IND vs SA Final live Score: भारताने शेवटची ICC ट्रॉफी कधी जिंकली होती?

    आयसीसी स्पर्धेत भारताचा शेवटचा विजय 2013 मध्ये झाला होता. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा 5 रन्सने पराभव केला. याआधी टीम इंडियाने 2011 च्या वनडे वर्ल्डकपवर कब्जा केला होता. आता दहा वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी भारत अजूनही आयसीसी ट्रॉफीची वाट पाहतोय.

  • IND vs SA Final live Score: बार्बाडोसमध्ये हवामान कसे असेल?

    Weather.com नुसार, पावसाचा अंदाज 70% आहे आणि स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता), खेळ सुरू होण्याची 66% शक्यता आहे. याशिवाय संध्याकाळीही हवामानाचा अंदाज असाच आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी 4:00 वाजता (भारतीय वेळेनुसार 1:30 वाजता) पावसाची 50% शक्यता आहे.

  • IND vs SA Final live Score: टी-20 वर्ल्डकपमध्ये कसा आहे टीम इंडियाचा प्रवास

    गेल्या दहा वर्षांपासून भारत प्रत्येक वेळी वर्ल्डकप विजेतेपदाचा प्रमुख दावेदार आहे, परंतु प्रत्येक वेळी पराभव सहन करावा लागला. 2014 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा श्रीलंकेकडून 6 विकेट्स राखून पराभव झाला होता. यानंतर 2016, 2021 आणि 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमला निराशेचा सामना करावा लागला. तर भारताने 2016 आणि 2022 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती.

  • IND vs SA Final live Score: टीम इंडिया 10 वर्षांचा दुष्काळ संपवणार?

    रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 वर्ल्डकप 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता जेतेपदाच्या लढाईत त्याचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. टीम इंडिया 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर फायनलमध्ये पोहोचली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link