LSG vs GT IPL 2023: के एल राहुल की हार्दिक पांड्या? आजचा सामना कोण जिंकणार? पाहा Playing 11
IPL 2023 LSG vs GT: आयपीएलच्या 30 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. आज घरच्या मैदानावर विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याचा लखनऊ सुपर जायंट्सचा विचार असणार आहे.
LSG vs GT Dream11 Prediction : आज आयपीएलच्या 30 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सशी (LSG vs GT) आमने-सामने येणार आहेत. लखनऊचा घरच्या मैदानावर हा सामना रंगणार असून इकना स्टेडियमवर गतविजेत्या गुजरातचे यजमानपद भूषवणार आहे. हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यावर गुजरातचे लक्ष्य असणार आहे. तर दुसरीकडे गेल्या सामन्यात राजस्थानविरुद्ध पराभूत झालेल्या गुजरात संघाला पुन्हा एका विजयी मार्गावर येण्याची संधी आहे. गेल्या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाने राजस्थान रॉयल्सचा 10 धावांनी पराभव केला. तर गुजरातने राजस्थानचा 3 गडी राखून पराभव केला होता. अशापरिस्थिती केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्यात कुणाच पारड जड राहणार हे पाहणार आहे.
गेल्या वर्षी सुपरजायंट्स विरुद्ध टायटन्स या सामन्यामध्ये गुजरात टायन्सचा संघ जिंकला होता. परंतु यंदा लखनऊ संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहता लखनऊ दुसऱ्या स्थानकावर आहे. दोन्ही संघांनी गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि उत्कृष्ट कामगिरी केली. विशेषत: गुजरातने गेल्या मोसमातही विजेतेपद पटकावले होते. त्याचवेळी लखनऊचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता.
वाचा : MS Dhoni संदर्भात CSK च्या चाहत्यांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी!
खेळपट्टीचा अहवाल
आज होणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सशीच्या सामन्यात इकना स्टेडियमवर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पूर्णपणे अनुकूल आहे. तसेच ही खेळपट्टी पहिल्या डावाच्या सुरुवातीला फलंदाजांना खूप फायदेशीर ठरेल. मात्र, खेळपट्टीही सामन्याच्या मध्यावर वेगवान गोलंदाजांना मदत करते. या खेळपट्टीवर लखनौने सर्वाधिक धावा केल्या आहेत. दिल्लीविरुद्ध खेळताना लखनऊने 20 षटकांत 6 गडी गमावून 193 धावा केल्या. त्याच वेळी, दिल्लीचा संघ या सामन्यात केवळ 143 धावा करू शकला, जो या खेळपट्टीवर बनवलेली सर्वात कमी धावसंख्या आहे.
तर या हंगामात लखनऊच्या खेळपट्टीवर आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 121 ते 193 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत आजच्या सामन्यात खेळपट्टी कोणते वळण घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवरून चांगली मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. तर फलंदाजांसाठी काही समस्या निर्माण होऊ शकतात. सामना दुपारी खेळला जाईल, त्यामुळे औंस फॅक्टर फरक पडणार नाही.
दोन्ही संघांचे संभाव्य खेळ-11
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल, काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, आवेश खान, युधवीर सिंग चरक, रवी बिश्नोई.
गुजरात टायटन्स: वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (क), विजय शंकर/अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा