MS Dhoni Viral Video: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि महान यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी हा नेहमी कूल म्हणून ओळखला जातो. मात्र, त्याचे साहस पाहून अनेकांना धक्का बसतो. धोनी हे नाव जगभरात क्रिकेटप्रेमींनी आदराने घेतले जाते. करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींना सेलिब्रेशनच्या अनेक संधी देणाऱ्या या माजी भारतीय कर्णधाराचे चाहते जगभरात आहेत. यामुळेच तेही आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. धोनीचे अनेक फोटो-व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडिओ रांचीचा आहे, ज्यामध्ये हा महान फलंदाजाची 'कूल' अंदाज दिसत आहे. रेसिंग बाइकचा हा व्हिडिओ जेएससीए स्टेडियममध्ये प्रवेश करतानाचा आहे.


धोनीचा स्वॅगच वेगळा, रेसिंग बाइक एन्ट्रीने मनेही जिंकली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या रांची येथील त्याच्या घरी आहे. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याची ग्रँड एन्ट्री दिसत आहे की, तो बॉलिवूड हिरोप्रमाणे  रेसिंग बाइकसह स्टेडियममध्ये कसा प्रवेश करतो ते.  तो स्टेडियमच्या गेटवर पोहोचताच गेटवर उपस्थित सुरक्षा रक्षक त्याला सलाम करतो. मग धोनीही त्याला नमस्कार करुन आत शिरतो.



सरावाचा व्हिडिओही व्हायरल


धोनीचे सरावाचे व्हिडिओही अलीकडे व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे, ज्यामध्ये धोनी जेएससीए स्टेडियममध्ये काही लोकांशी बोलत आहे. असे दिसते की धोनी त्याला आधीपासूनच ओळखतो किंवा ते त्याचे मित्र आहे. त्याच्या पायात पॅडही बांधले आहे आणि त्याच्याभोवती अनेक लोक जमा झाले आहेत. यावरून धोनी सराव करत होता की सराव संपल्यानंतर ही बैठक झाली हे स्पष्ट झाले आहे.



IPL-2023 ची तयारी आतापासूनच 


पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी धोनीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. तो पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाची कमान सांभाळणार आहे. धोनीने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. तरी तो आयपीएलमध्ये खेळतो. गेल्या मोसमात पहिल्या काही सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाला सीएसकेचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, नंतर त्याने पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवले गेले आहे.