मॅक्सवेलचा हा जबरदस्त कॅच सोशल मीडियावर चर्चेत
मॅक्सवेलचा जबरदस्त कॅच...
अबुधाबी : आयपीएलचा 13 वा सीजन रंगतदार बनत आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण. प्रत्येक क्षेत्रात खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले आहे. अबुधाबीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या मोसमातील 13 व्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. या सामन्यात रोहित शर्माने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. रोहितने 45 बॉलमध्ये 90 धावांची चमकदार खेळी करत केली. त्याने आयपीएलमधील आपले 5000 रन देखील पूर्ण केले आहेत.
या सामन्यात रोहितच्या खेळीशिवाय तो ज्या पद्धतीने बाद झाला आहे तेही आश्चर्यकारक ठरलं. मोहम्मद शमीच्या बॉलवर रोहितने लांब शॉर्ट खेळला पण ग्लेन मॅक्सवेलने उत्कृष्ठ फिल्डींग करत बॉल जेम्स नीशमकडे टाकला. नीशमने बॉल पकडला आणि रोहितची मोठी विकेट पंजाबला मिळाली.
ग्लेन मॅक्सवेलची फिल्डींग पाहून सगळेच हैराण झाले. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी रोड्स देखील त्याच्या खुर्चीवरून पटकन उठला. मॅक्सवेलच्या या कामगिरीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने 4 विकेट गमवत 191 रन केले होते.