Delhi Capitals Team Emotional: रविवारचा दिवस रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या चाहत्यांसाठी फारच आनंदाचा ठरला. गेल्या 16 वर्षांपासून आरसीबीचे खेळाडू आणि चाहते ज्या प्रतिक्षेत होते, ती गोष्ट अखेर घडली. रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या महिलांच्या टीमने वुमेंस प्रिमीयर लीगची ट्रॉफी अखेर उचलली. WPL 2024 च्या फायनल सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. WPL 2023 मध्येही दिल्ली कॅपिटल्सचा फायनलमध्ये पराभव झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी फायनलमध्ये झालेल्या पराभवामुळे दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगला अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WPL 2024 च्या फायनल सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 8 विकेट्सने पराभव केला. दिल्लीचा हा पहिला नाही तर अंतिम फेरीतील सलग दुसरा पराभव होता. पहिल्या सिझनमध्ये दिल्लीची टीम अंतिम फेरीत पोहोचली होती. त्यावेळी त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सलग दुसऱ्यांदा फायनल गमावणारी दिल्ली कॅपिटल्स टीम यावेळी खूपच भावूक दिसली. 


मेग लॅनिंगला अश्रू अनावर


एकीकडे पहिल्यांदा ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येता. मात्र दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स टीमच्या महिला फारच भावूक झाल्याचं दिसून आलं. यावेळी दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामध्ये तिच्या भावना दाटून आल्याचं दिसतंय. तिचे पाणावलेले डोळे पाहून चाहतेही भावूक झाले. 



कर्णधार लॅनिंगशिवाय टीममधील इतर खेळाडू देखील भावूक झाले होते. दिल्ली कॅपिटल्सच्या डगआऊटमध्येही सपोर्ट स्टाफ पराभवानंतर उदास दिसत होते. गेल्या 16 वर्षांमध्ये दिल्लीची टीमदेखील ट्रॉफी जिंकून शकलेली नाही. 


WPL च्या दुसऱ्या सिझनमध्ये बंगळूरूचा विजय


वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्लीचा पराभव करून दिमाखात डब्ल्यूपीएलची ट्रॉफी (WPL 2024 Trophy) उचलली. आता आरसीबी फ्राँचायझीने 2,844 दिवसांनंतर ट्रॉफीवर नाव कोरलंय. दिल्लीने दिलेलं 114 रन्सचं आव्हान आरसीबीसाठी किरकोळ होतं. स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन यांनी दमदार सुरूवात करून दिली. सोफीने 27 बॉलमध्ये 32 रन्सची खेळी केली. तर कॅप्टन स्मृती मानधना हिने 39 बॉलमध्ये 31 रन्सची संयमी खेळी केली. 


दिल्लीने आव्हान कमी रन्सचं असल्याने आरसीबीने घाई न करता शांत खेळी केली. एलिस पेरीने स्मृतीनंतर डाव सावला. रिचा घोषने तिला मोलाची साथ दिली. आरसीबीला अखेरच्या 3 ओव्हरमध्ये 18 धावांची गरज होती. तरीही दिल्लीने कडवी झुंज दिली अन् सामना अखेरच्या ओव्हरमध्ये नेला. अखेर रिचा घोषने खणखणीत फोर खेचत आरसीबीचं स्वप्न पूर्ण केलंय.