Mohammed Shami Wicket Video:  इंग्लंडमधील ओव्हल येथे आजपासून सुरू झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final 2023) अंतिम सामन्यात रोमांच पहायला मिळतोय. पिचचा अंदाज बांधत रोहित शर्माने चार फास्ट बॉलर खेळवले आहेत. शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि मोहम्मद सिराज यांच्या खांद्यावर गोलंदाजीची धुरा असणार आहे. अशातच सर्व फास्टर भेदक गोलंदाजी करत असल्याचं दिसत आहेत. अशातच आता मोहम्मद शमीच्या गोळीगत आलेल्या बॉलवर मार्नस लॅबुशेनच्या (Marnus Labuschagne) दांड्या गुल झाल्या. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंच टाईमनंतर टीम इंडियाने आक्रमक गोलंदाजी सुरू केली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगच्या 24 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने शमीच्या हातात पुन्हा बॉल सोपवला. पहिल्याच बॉलवर शमीने (Mohammed Shami Wicket) लॅबुशेनविरुद्ध धक्कातंत्र वापरलं. बॉल आऊटस्विंग होणार अशी शक्यता असताना शमीचा बॉल इनस्विंग झाला आणि पापणी लवण्याच्या आत शमीने लॅबुशेनला तंबूत पाठवलं. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Trending Video) होत असल्याचं दिसतंय.


पाहा Video 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


मोहम्मद शमीच्या सुंदर इनस्विंग बॉलवर स्टीव्ह स्मिथ (Steven Smith) देखील शॉक झाला. त्यावेळी त्यांने लावलेला अंदाज आणि त्याची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मोहम्मद शमीने आयपीएलमध्ये खेळताना 28 विकेट घेतले होते. त्याचबरोबर तो यंदाचा पर्पल कॅप होल्डर देखील होता. त्यामुळे चालू सामन्यात त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहे.


आणखी वाचा - WTC Final 2023: काळी पट्टी बांधून प्लेयर्स का खेळतायेत मॅच? जाणून घ्या कारण!


टीम इंडिया (Playing XI):


रोहित शर्मा (C), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भारत (WC), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.


ऑस्ट्रेलिया (Playing XI):


डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (WC), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.