नवी दिल्ली : क्रिकेटर मोहम्मद शमी अपघातात जखमी झाला आहे. मोहम्मद शमी डेहराडूनहून दिल्लीला जात असताना हा अपघात झाला. या अपघातादरम्यान शमीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ज्यामुळे त्याला टाके मारण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेहराडू - सहारनपुर रोडवर शमीचा हा अपघात झाला आहे. हा अपघात सकाळी साडे सातच्या सुमारास झाला असून हाताला आणि डोक्याला फटका बसला आहे. तसेच शमीच्या डोल्याजवळही दुखापत झाली आहे. शमीला या अपघातानंतर सीएमआय हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता नेण्यात आलं तेथे शमीला 5 टाके मारण्यात आले. शमीला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिली आहे. सध्या शमी डेहराडूनला आपल्या मित्राच्या घरी आराम करत आहे. 


टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी पत्नीसोबत सुरु असलेल्या वादामुळे अडचणीत आला. पत्नीनं केलेल्या आरोपांमुळे मोहम्मद शमी चांगलाच अडचणीत सापडला होता. बीसीसीआयने त्याचा करारही रद्द केला होता. मात्र, नंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकानं केलेल्या चौकशीत शमीला क्लिन चीट मिळाली.


शमीला मोठा दिलासा


बीसीसीआयनं अखेर मोहम्मद शमीसोबतच्या कराराचं नुतनीकरण केलं आहे. मोहम्मद शमीचा बीसीसीआयनं बी ग्रेडमध्ये समावेश केला आहे. क्लिन चीटमुळे मोहम्मद शमीला मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.


देहरादूनमध्ये शमीची प्रॅक्टिस


आयपीएलच्या तयारीसाठी मोहम्मद शमी देहरादूनमध्ये दाखल झाला आहे. याच ठिकाणी मोहम्मद शमी आपल्या बॉलिंगची प्रॅक्टिस करत आहे. नुकत्याच झालेल्या वादामुळे शमी खूपच तणावात होता. त्यानंतर आता देहरादूनमध्ये शमी क्रिकेट अकादमीत बॉलिंग प्रॅक्टिस करत आहे. यासोबतच शमी टेनिसही खेळताना पहायला मिळाला.