IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 (IPL 2025)  साठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार असून यात जवळपास 577 खेळाडूंवर बोली लावली जाईल. सौदी अरेबियाच्या जेद्दाह स्टेडियमवर भव्यदिव्य ऑक्शन पार पडणार असून यासाठी महिन्याभरापासूनच तयारीला सुरुवात करण्यात आली होती. यंदा आयपीएल ऑक्शनमध्ये अनेक स्टार खेळाडू आपलं नशीब आजमावणार आहेत, तेव्हा यापैकी कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत आयपीएलच्या ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंविषयी जाणून घेऊयात. 


आयपीएलच्या ऑक्शनच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम एस धोनी  2008 : आयपीएल 2008 रोजी झालेल्या पहिल्या आयपीएल ऑक्शनमध्ये भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीवर सुमारे 8 कोटींची बोली लागली होती आणि चेन्नई सुपरकिंग्सने त्याला आपल्या संघात घेतलं. 


अँड्र्यू फ्लिंटॉफ 2009 : आयपीएल 2009 ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्जने अँड्र्यू फ्लिंटॉफला 9.8 कोटींना विकत घेतले. तो त्या ऑक्शनमधला सर्वात महागडा खेळाडू ठरला. 


शेन बॉण्ड 2010 : आयपीएल 2010 मध्ये शेन बॉण्डवर त्या वर्षीच्या आयपीएलमधील सर्वात मोठी बोली लागली होती. यात त्याच्यावर जवळपास 6.3 कोटींची बोली लावून कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना विकत घेतले. 


गौतम गंभीर  2011 : गौतम गंभीरवर आयपीएल 2011 च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक बोली लावली होती. त्यांनी गंभीरला $2.4 million ची बोली लावून आपल्या संघात कर्णधार म्हणून घेतलं. 


हेही वाचा : IPL ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने KKR चा माणूस फोडला, ऑक्शन टेबलवर खरा खेळ रंगणार


 


रवींद्र जडेजा 2012 : आयपीएल 2012 मध्ये रवींद्र जडेजावर चेन्नई सुपरकिंग्सने त्या सीजनमधील सर्वाधिक बोली लावली होती. यात चेन्नईने जडेजा 9.8 कोटी रुपये खर्च केले. 


ग्लेन मॅक्सवेल 2013 : आयपीएल 2013 मध्ये ग्लेन मॅक्सवेलवर सर्वाधिक बोली लागली होती. ग्लेन मॅक्सवेल या ऑक्शनमध्ये $1M वर विकला गेला. 


युवराज सिंह 2014 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2014 मध्ये युवराज सिंहवर जवळपास 14 कोटींची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतले.


युवराज सिंह 2015 : युवराज सिंहवर आयपीएल 2015 मध्ये दिल्ली डेरडेव्हिल्स संघाने तब्बल 16 कोटींची बोली लावली होती.


शेन वॉट्ससन 2016 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल आयपीएल 2016 मध्ये शेन वॉट्ससनला 9 कोटी 50 लाखांना विकत घेतले होते. 


बेन स्टोक्स 2017 : रायजिंग पुणे सुपरजाएंट्सने 2017 मध्ये बेन स्टोक्सवर 14.5 कोटींची बोली लावली होती. 


हेही वाचा : राजा राजाच असतो! ऑस्ट्रेलिया विरुद्ध किंग कोहलीने ठोकलं 80 वं शतक; टीम इंडियाने घोषित केला डाव


 


बेन स्टोक्स 2018 : बेन स्टोक्स याला आयपीएल 2016 राजस्थान रॉयल्सने 12.5 कोटींना विकत घेतलं. तो त्या ऑक्शनमधला सर्वात महागडा खेळाडू ठरला. 


जयदेव उनाडकट 2019 : राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकट याला 2019 मध्ये 8.4 कोटींना विकत घेतलं होतं. 


पॅट कमिन्स 2020 : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2020 च्या ऑक्शनमध्ये पॅट कमिन्सला 15.50 कोटींना विकत घेतले. 


ख्रिस मॉरिस 2021: ख्रिस मॉरिस याला आयपीएल 2021 च्या ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटींना विकत घेतले होते.


ईशान किशन 2022 : ईशान किशन हा आयपीएल २०२२ चा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने 15.25 कोटींना विकत घेतले. 


मिचेल स्टार्क 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्क याला आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये 24.75 कोटींना विकत घेतलं. तो त्या सीजनचा सर्वात सर्वात महागडा खेळाडू ठरला.