IND VS AUS 1st Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज सुरु असून यातील पहिला सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. पर्थ येथे सुरु असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) दमदार शतक ठोकलं आहे. हे विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधील 80 वं शतक होतं. यासह दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाची धावसंख्या 487 झाली असून भारताने 534 धावांची आघाडी घेतल्यावर डाव घोषित केला.
शुक्रवार 22 नोव्हेंबर पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे टेस्ट सामन्याला सुरुवात झाली. यात टीम इंडियाने टॉस जिंकून निवडलेल्या फलंदाजीच्या पहिल्या इनिंगमध्ये 150 धावा केल्या. तर टीम इंडियाच्या गोलंदाजी समोर टीम इंडिया फक्त 104 धावाच करू शकली. तर दुसऱ्या दिवशी फलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाकडून केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना नाबाद 172 धावा केल्या आणि भारताने 200 पार धावांची आघाडी घेतली. रविवारी तिसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वालने त्याचं शतक पूर्ण करून 161 धावा केल्या. तर त्याच्या पाठोपाठ विराट कोहलीनेही मैदानात जम बसवत शतक ठोकले. यामुळे टीम इंडियाने 487 धावा करून 534 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाने डाव घोषित करून ऑस्ट्रेलियाला आता विजयासाठी 535 धावांचं आव्हान दिलं आहे.
हेही वाचा : IPL ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने KKR चा माणूस फोडला, ऑक्शन टेबलवर खरा खेळ रंगणार
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा पर्थ टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना अवघ्या ५ धावा करून बाद झाला होता. त्यावरून विराटला सोशल मीडियावर मोठ्या ट्रोलिंगला समोर जावं लागलं होतं. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये विराटने ही कसर भरून काढली आणि थेट नाबाद शतक ठोकलं. विराटचं टेस्ट क्रिकेटमधील हे 30 वं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधील 80 वं शतक ठरलं. हे शतक विराटने 143 बॉलमध्ये पूर्ण केलं दरम्यान त्याने 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले.