MS Dhoni in IPL 2023 : एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली. आयपीएलच्या 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा (Csk Vs Srh ) 7 गडी राखून पराभव केला. या सामन्याच्या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्ज तिसऱ्या स्थानकावर आली आहे. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्सवर 134 धावा करता आल्या. यानंतर डेव्हॉन कॉनवे (77*) आणि ऋतुराज गायकवाड (35) यांनी 8 चेंडू राखून विजयाचे लक्ष्य गाठले. दरम्यान या सामन्यानंतर एमएस धोनीने (MS Dhoni) हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधताना निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले. या वक्तव्यानंकर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेपॉक स्टेडियमवर शुक्रवारी (21 एप्रिल 2023) चेन्नई सुपर किंग्जने चांगला खेळी केली. या संघाने अखेर सनरायझर्स हैदराबादचा सहज पराभव केला.  एमएस धोनीच्या संघातील रवींद्र जडेजाची उत्कृष्ट गोलंदाजी आणि डेव्हॉन कॉनवेची दमदाक खेळी याशिवाय एमएस धोनीचा स्टंपिंग, झेल आणि विकेटमागे धावचीत हे देखील विजयाचे मोठे कारण होते.  यानंतर धोनीने स्वत:च्या निवृत्तीबाबत केलेल्या वक्तव्याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष गेले. 



हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधताना एमएस धोनी म्हणाला, या क्रिकेट विश्वात चेन्नईतील प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळाले आहे त्यामुळे मी भारावून गेलो आहे. येथे खेळणं म्हणजे नेहमीच एक वेगळा अनुभव असतो. दोन वर्षानंतर प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळाली असून त्यांच्यासमोर खेळणं खूप खास आहे. त्यानंतर धोनी पुढे म्हणाला, दुसरं काय सांगू, आता मी सर्व काही सांगितले आहे... हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा आहे... फलंदाजीची फारशी संधी मिळत नाही, पण याबाबत तक्रार नाही. येथे मला सुरुवातील क्षेत्ररक्षण करताना संकोच वाटत होता. कारण मला वाटले की तेथे जास् दव पडणार नाही. आमच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. 



दरम्यान, एमएस धोनीचा संघ यंदाच्या मोसमात चांगल्या लयीत दिसत आहे. चेन्नईचा या मोसमातील सहा सामन्यांमधील हा चौथा विजय आहे. या संघाने दोन सामने गमावले आहेत. आठ गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे राजस्थान आणि लखनऊ सुपर जायंट्सचे बरोबरीचे गुण आहेत. पण राजस्थानचा रन रेट सर्वांत चांगला आहे आणि त्यामुळे RR संघ अव्वल आहे. लखनीऊ दुसऱ्या आणि चेन्नई तिसऱ्या स्थानावर आहे.