मुंबई : MS Dhoni News : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय-बाय केले असले तरी आजही त्याचे चाहते जगभर आहेत. धोनीकडे पैशांची तसेच प्रसिद्धीची कमतरता नाही. सचिन तेंडुलकर याच्यानंतर तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पैसे कमवणारा क्रिकेटपटू आहे. पण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केल्यानंतरही धोनी एवढे पैसे कसे कमवतो? चला... त्यांच्या उत्पन्नाचे काही मुख्य स्त्रोत पाहू.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) अजूनही वार्षिक 74 कोटी रुपये कमावतो. धोनी आयपीएल वगळता जास्त स्पर्धात्मक क्रिकेट खेळत नाही. पण त्याला त्याच्या IPL टीम CSK आणि अनेक ब्रँड असोसिएशनकडून भरपूर पैसे मिळतात.



आयपीएल सुरू झाल्यापासून धोनी चेन्नई सुपर किंग्ज या फ्रँचायझीशी संबंधित आहे. CSK धोनीला 15 कोटी रुपये पगार देते. कोणत्याही CSK खेळाडूला धोनीपेक्षा जास्त पगार मिळत नाही.



डोमेन वेबसाइट्सपासून ते विवाह विषयक वेबसाइट्सपर्यंत, धोनी अजूनही जगभरातील कंपन्यांसाठी सर्वात विश्वासू चेहऱ्यांपैकी एक आहे. मोठ्या कंपन्या स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी धोनी याच्याशी करार करतात.



धोनी याचे रांचीमध्ये एक मोठे फार्म हाऊस आहे आणि त्यात जवळपास 80 बाईक्सचा समावेश आहे. याशिवाय या फार्म हाऊसमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. या सर्व कार आणि बाईक्सची किंमत कोट्यवधीमध्ये आहे.



कमाईच्याबाबतीत धोनी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या मागे आहे. धोनी प्रमाणेच सचिन देखील एका इलेक्ट्रिकल कंपनीशी म्युच्युअल फंड आणि इतर अनेक ब्रँडशी जोडला गेला आहे. त्याचा या कंपन्यांशी करार झाला आहे.


हे पण वाचा: पुढच्या वर्षी खेळणार का? IPL मधून निवृत्तीसंदर्भात धोनीचे मोठे विधान