पुढच्या वर्षी खेळणार का? IPL मधून निवृत्तीसंदर्भात धोनीचे मोठे विधान

धोनी पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार का? पाहा धोनीने काय दिलं उत्तर

Updated: Oct 7, 2021, 04:33 PM IST
पुढच्या वर्षी खेळणार का? IPL मधून निवृत्तीसंदर्भात धोनीचे मोठे विधान title=

दुबई : IPL 2021 हंगामातील 53 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात खेळला जात आहे, ज्यामध्ये पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसकेने प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले असेल, पण कर्णधार महेंद्रसिंह धोनीची बॅट फार काही करू शकलेली नाही. आता धोनीने आयपीएलमधून निवृत्तीसंदर्भात मोठे विधान केले आहे.

नाणेफेक करताना महेंद्रसिंह धोनी म्हणाला, "पुढच्या वर्षी तुम्ही मला पिवळ्या रंगात पाहू शकता, पण मी CSK कडून खेळणार का? याबाबत बरीच अनिश्चितता आहे. याचं साधं कारण म्हणजे 2 नवीन संघ येणार आहेत. त्यामुळे रिटेंशन पॉलिसी काय असेल, कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाईल, किती परदेशी खेळाडू असतील. याबाबत काहीही माहित नाही. हे सर्व पाहावं लागेल.'

पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुलने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबसाठी हा सामना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शेवटची संधी लक्षात घेता अत्यंत महत्त्वाचा आहे. जरी त्यांनी सामना जिंकला, तरी त्यांना बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी इतर संघावर अवलंबून राहावे लागेल, तर CSK साठी दोन पराभवानंतर विजयी मार्गावर परतण्यासाठी हा सामना महत्त्वपूर्ण असेल.