DC vs MI : चित्तथरारक सामन्यात दिल्लीचं `पानीपत`; शेवटच्या बॉलवर मुंबईने उघडलं विजयाचं खातं
मुंबईने दिल्लीवर (Mumbai Indians Beat Delhi Capitals) 6 विकेट्सने विजय मिळवला. गेले अनेक दिवस टीका होत असलेल्या रोहित शर्माची बॅट अखेर आज तळपली. रोहितच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या विजयाची नोंद केली आहे.
DC vs MI : आज दिल्लीच्या मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यामध्ये 14 वा सामना रंगला होता. अखेर या सामन्यात विजय मिळवत मुंबईच्या टीमने यंदाच्या सिझनमध्ये विजयाचं खातं उघडलं आहे. मुंबईने दिल्लीवर (Mumbai Indians Beat Delhi Capitals) 6 विकेट्सने विजय मिळवला. गेले अनेक दिवस टीका होत असलेल्या रोहित शर्माची बॅट अखेर आज तळपली. रोहितच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या विजयाची नोंद केली आहे.
शेवटच्या बॉलवर मुंबईचा विजय
मुंबई विरूद्ध दिल्ली हा सामना देखील उत्कंठा वाढणारा होता. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचलेल्या या सामन्यात अखेर मुंबईनेच बाजी मारली. मुंबईला शेवटच्या ओव्हरमध्ये 2 रन्सची गरज होती. त्यावेळी टीम डेविड स्ट्राईकला होता, त्याने शॉट मारला आणि 2 रन्ससाठी पळायला सुरुवात केली. दुसरा रन काढताना विकेटकीपरकडे बॉल पोहोचेपर्यंत टीम क्रिजमध्ये पोहोचला होता आणि मुंबईचा विजय झाला होता.
रोहित शर्माची कॅप्टन इनिंग
रोहित शर्माने आजच्या सामन्यात तुफान फलंदाजी केली. 45 बॉल्समध्ये हिटमॅनने 65 रन्स केले. यामध्ये 4 सिक्स आणि 6 फोर्सचा समावेश होता. आजच्या सामन्यात ज्यावेळी टीमला गरज होती, तेव्हा रोहित शर्माची बॅट तळपली.
मुंबईच्या गोलंदाजांपुढे दिल्लीचे फलंदाज ढेर
मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा डाव 172 रन्सवर आटोपला. दिल्लीकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 54 रन्स केले. त्याचवेळी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 51 रन्सची खेळी केली. दिल्लीच्या टीमला या सामन्यात पूर्ण 20 ओव्हर्सही खेळता आल्या नाही.
दिल्ली कॅपिटल्सने सर्व फलंदाज अवघ्या 19.4 ओव्हर्समध्ये 172 रन्स करून पव्हेलियनमध्ये परतले. मुंबईकडून पियुष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फने यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतले. तक रिले मेरेडिथला दोन आणि हृतिक शोकीनला एक विकेट मिळाली.
अक्षर पटेलचं तुफान अर्धशतक
अक्षर पटेलने 22 बॉल्समध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने त्याच्या खेळीत खेळीत पाच सिक्स आणि 4 चौकार मारले आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे दिल्ली टीमला चांगली धावसंख्या गाठली आहे. अखेर 54 रन्सच्या स्कोरवर जेसन बेहरेनडोर्फच्या गोलंदाजीवर त्याने विकेट गेली आणि त्याला माघारी परतावं लागलं.