लंडन : बीसीसीआयने ईसीबीला दोन अतिरिक्त टी-20 सामने किंवा एक कसोटी सामना खेळण्याचा प्रस्ताव दिला होता. टीम इंडियाला पुढील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. फिजिओ योगेश परमार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मालिकेच्या शेवटच्या कसोटीत टीम इंडियाने मैदानात उतरण्यास नकार दिला होता. त्यानंतर दोन्ही मंडळांना सामना रद्द करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ईएसपीयन क्रिकइन्फो'च्या बातमीनुसार, ईसीबीची बीसीसीआयने एक कसोटी सामना खेळण्याची ऑफर स्वीकारली आहे. दोन्ही मंडळांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही किंवा हा सामना पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


उल्लेखनीय म्हणजे, पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाला खूप त्रास सहन करावा लागला आणि त्याने भरपाईसाठी आयसीसीला पत्रही लिहिले. पाचवी कसोटी रद्द झाली त्यावेळी टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर होती.


लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला होता आणि त्यानंतर संघाला लीड्समध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ओव्हल कसोटीत टीम इंडियाने जबरदस्त खेळ दाखवला आणि 157 धावांनी इंग्लिश संघाचा पराभव केला.


भारताने इंग्लंडविरुद्ध 2007 मध्ये इंग्लिश कंडिशनमध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. यानंतर, संघाला 2014 आणि 2018 च्या दौऱ्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.