Neeraj Chopra Wins Diamond league : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि गोल्डन बॉय नीरज चोप्राने (#NeerajChopra) पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या अँडरसन पीटर्सला हरवत डायमंड लीग स्पर्धेवर आपलं नाव कोरलं आहे. ही स्पर्धा जिंकून त्याने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. (#DohaDiamondLeague)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भाला फेकला होता आणि  स्पर्धेवर नावं कोरलं.



या कामगिरीनंतर नीरज चोप्रावर क्रीडा विश्वातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.  


दोहा डायमंड लीग स्पर्धेत कशी होती नीरज चोप्राचं प्रदर्शन?


पहिला प्रयत्न  नीरजने 88.67 मीटरवर भाला फेकला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 86.04 मीटर,  तिसरा प्रयत्नात 85.47 मीटर , चौथा प्रयत्नात x तर पांचवा प्रयत्नात 84.37 मीटर आणि शेवटच्या सहावा प्रयत्नात 86.52 मीटरवर भाला फेकला. 


 दोहा डायमंड लीगची अंतिम तक्तेवारी पाहता पहिल्या क्रमाकांवर भारताच्या नीरज चोप्राने 88.67 मीटर रेकॉर्ड केला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जॅकब वडलेज्च (चेक गणराज्य) - 88.63 मीटर, तिसऱ्या क्रमांकावर अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) - 85.88 मीटर , चौथ्या क्रमांकावर जूलियन वेबर (जर्मनी) - 82.62 मीटर , पाचव्या क्रमांकावर अँड्रियन मर्डारे (मोल्डोवा) - 81.67 मीटर, सहाव्या क्रमांकावर केशोर्न वाल्कॉट (त्रिनिदाद अॅण्ड टोबॅगो) - 81.27 मीटर , सातव्या क्रमांकावर रोड्रिक जी. डीन (जापान) - 79.44 मीटर आणि आठव्या क्रमांकावर कर्टिस थॉम्पसन (यूएसए) - 74.13 मीटर वर होते. 


गेल्या वर्षीच्या झुरिच झालेल्या स्पर्धेत भालाफेकमध्ये भारतीय राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या नीरज चोप्राने भाग घेतला नव्हता. त्याला दुखापतीमुळे नीरज या स्पर्धेला मुकला होता. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धा होणार आहे. त्यामुळे नीरजसाठी 2023 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. 


डायमंड लीग म्हणजे काय?


डायमंड लीग ट्रॅक अँड फील्ड ही सर्वोच्च एॅथलेटिक चॅम्पियनशिपपैकी एक आहे. पूर्वी हिला जागतिक एॅथलेटिक म्हणून ओळखलं जायचं. ही स्पर्धा वर्षातून एकदाच खेळली जाते. यावर्षी स्पर्धेत 14 एकदिवसीय सामने खेळल्या गेले.  या स्पर्धेत एकून 32 खेळाडूंनी भाग घेतला होता.