IPL 2023: ना गुजरात ना मुंबई, श्रीसंत म्हणतो `या` दोन टीम आयपीएल फायनल खेळणार!
IPL Playoffs qualification scenarios: यंदाची आयपीएल फायनल (IPL 2023 Final) कोणता संघ खेळणार? यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता टीम इंडियाचा माजी गोलंदाज आणि समालोकच एस श्रीसंत (S Shreesant) याने मोठं भाकित वर्तविलं आहे.
Shreesant On IPL 2023 Final: आयपीएल 2023 चा सोळावा हंगाम आता अंतिम स्टेजमध्ये आहे. सर्व संघाचे दोन एक सामने शिल्लक असताना आता प्लेऑफचं गणित (IPL Playoffs qualification scenarios) अधिक किचकट होताना दिसतंय. सर्वात आधी गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) प्लेऑफमध्ये आपली जागा फिक्स केलीये. त्यानंतर आता उर्वरित तीन जागेसाठी तुफान गणिताचे समीकरणं जुळवली जात आहेत. अशातच आता फायनल (IPL 2023 Final) कोणता संघ खेळणार? यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायन्ट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघामध्ये आता चुरशीची लढाई पहायला मिळत आहे. तीन जागा आणि सहा संघ, अशी परिस्थिती असताना आता कोणता संघ बाजी मारेल, यावर गदड चर्चा होताना दिसते. अशातच आता टीम इंडियाचा माजी गोलंदाज आणि समालोकच एस श्रीसंत (S Shreesant) याने मोठं भाकित वर्तविलं आहे.
काय म्हणाला श्रीसंत?
यंदाचा हंगाम आणखी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचवला आहे. पाँईंट्स टेबलचं गणित जुळवण्याचा प्रयत्न आता सर्व संघ करतील. मात्र, मला वाटतं की या वर्षी फायनल सामना हा लखनऊ सुपर जायन्ट्स (Lucknow Super Giants) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात पहायला मिळेल, असं श्रीसंत याने स्टार स्पोटर्सवर बोलताना भविष्यवाणी केली आहे. दोन्ही संघांना आता उर्वरित सामने चांगले खेळावे लागणार आहे. तर पहिल्या दोन स्थानावर कोणता संघ असेल? हे देखील पहावं लागेल, असंही श्रीसंत यावेळी म्हणालाय.
आणखी वाचा - IPL 2023 PK vs DC: दिल्लीने फिरवला Playoffs चा गेम, आता कसं असेल समीकरण?
दरम्यान, श्रीसंतने केलेली भविष्यावाणी दर सत्यात उतरवायची असेल तर आजच्या सामन्यात बंगळुरूला मोठा विजय नोंदवणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर लखनऊला दुसऱ्या स्थानावर पोहोचून पहिल्या क्वालिफायरमध्ये (Qualifier 1) गुजरातचा सुपडा साफ करावा लागेल. त्यानंतर आरसीबी दबक्या पावलांनी पहिल्यांदा इलिमिनेटर (Eliminator) आणि क्वालियाफर टू (Qualifier 2) जिंकून फायनलमध्ये पोहचावं लागेल, श्रीसंत म्हणाला तसं घडणं शक्य आहे, अशक्य निश्चित नाही. मात्र, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. त्यामुळे आत्ताच यावर विश्लेषण करणं चुकीचं ठरेल.