Sunil Gavaskar On Hardik Pandya: यंदाच्या आयपीएलच्या (IPL 2023) सुरूवातीपासून गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं आहे. त्याचंच फलित म्हणून गुजरातचा संघ सलग दुसऱ्या वर्षी फायनलमध्ये (IPL 2023 Final) आहे. डिफेन्डिंग चॅम्पियन गुजरात टायन्टस यंदा फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जशी (CSK) भिडणार आहे. येत्या 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल सामना खेळवला जाईल. या सामन्यात शुभमन गिलच्या (Shubhman Gill) कामगिरीवर लक्ष असणार आहे. अशातच आता टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.


काय म्हणाले सुनील गावस्कर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याने नेहमीच महेंद्रसिंह धोनीबद्दल कौतुकाबद्दल आणि प्रेमाबद्दल खूप मोकळेपणाने बोलतो. अनेकांनी महेंद्रसिंग धोनीच्या कारकिर्दीचा पाठपुरावा करून त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रकारे हार्दिक देखील आपली यशस्वी वाटचाल रचतोय. जेव्हा तो टॉससाठी मैदानात येतो. त्यावेळी तो नेहमी हसत आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण वातावरण तयार करतो, असं म्हणत गावस्कर (Sunil Gavaskar On Hardik Pandya) यांनी पांड्याचं कौतूक केलंय.


पांड्याला दिला सल्ला


सामन्याबाहेर तो मैत्रीपूर्ण वातावरणात असतो. मात्र, ज्यावेळी तो मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरतो, त्यावेळी तो वेगळाच माहोल असतो. तो किती लवकर शिकला हे दाखवण्याची हार्दिक पांड्याकडे उत्तम संधी आहे, असंही म्हणत सुनील गावस्कर यांनी पांड्याला मोलाचा सल्ला देखील दिलाय.


आणखी वाचा - IPL 2023: 'तेव्हा माझ्या लक्षात आलं...'; शतकवीर शुभमन गिल केला सर्वात मोठा खुलासा!


जेव्हा हार्दिक पांड्या मागील वर्षी गुजरात टायटन्सचं कॅप्टन्सी करत होता, त्यावेळी कोणाला वाटलं देखील नसेल की तो अशी चमकदार कामगिरी करू शकतो. ज्याप्रकारे हार्दिक आपल्या टीमला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यावरून धोनीची आठवण येते. चेन्नईसारखी गुजरात देखील शांत टीम आहे. या सर्वाचं श्रेय हार्दिक पांड्याला द्यायला पाहिजे, असंही गावस्कर म्हणाले आहेत.


नवीन निवड समिती युवा खेळाडूंना अधिक संधी देऊ इच्छित आहे. याचा अर्थ विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा यापुढे विचार केला जाणार नाही, असं वक्तव्य सुनील गावस्कर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर टीम इंडियाचं नेतृत्व करणार तरी कोण? असा सवाल विचारला जात होता.