Harbhajan Singh On Yashasvi Jaiswal: इंडियन प्रमियम लीगने आत्तापर्यंत टीम इंडियाने (Team India) अनेक युवा खेळाडू दिले आहेत. गेल्या 15 वर्षात अनेक खेळाडू टीम इंडियासाठी देखील खेळलेत. अशातच यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक नवे चेहरे समोर आले आहेत. ज्यांची उल्लेखनीय कामगिरी नक्कीच टीम इंडियाचे दरवाजे खटखटू शकते. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू आणि आयपीएलचा समालोकच असलेल्या हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने मोठं वक्तव्य केलंय.


काय म्हणाला हरभजन सिंह?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या आयपीएल 2023 (IPL 2023) च्या युवा फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर शुभमन गिलमध्ये (Shubman Gill) क्षमता आहे, जो टीम इंडियासाठी सात्त्याने खेळू शकतो. त्याच्यात भारताचे भविष्य बनण्याची क्षमता आहे. पण मला वाटतं की यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiwal) हा या वर्षातील सर्वात प्रभावी खेळाडू आहे.  तो येत्या काही वर्षांत टीम इंडियासाठी नक्कीच खेळेल. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचं शतक कोणीही विसरू शकत नाही, असं हरभजन सिंह याने म्हटलं आहे.


आगामी टीम इंडियामध्ये शुभमन गिल कदाचित कर्णधार असेल, असं भाकित देखील हरभजन सिंह याने केलं आहे. टिळक वर्मा आणि रिंकू सिंग हे असे खेळाडू आहेत. त्यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये आपली चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केलंय. त्यामुळे मला आशा आहे की, ते दोन्ही खेळाडू येत्या काळात टीम इंडियाचा भाग असतील. भारतीय संघाच्या भविष्यासाठी मी एक संघ बनवत आहे. ते सर्व अविश्वसनीय प्रतिभावान खेळाडू आहेत, असंही हरभजन यावेळी म्हणाला आहे.


आणखी वाचा - CSK vs GT: 'तू निर्लज्ज आहेस...', ऋतुराज गायकवाड वर बोलताना 'या' खेळाडूची जीभ घसरली? पहा व्हिडिओ..


हरभजन याने शुभमन गिल (Shubman Gill), यशस्वी जायसवाल (Yashasvi Jaiswal), तिलक वर्मा (Tilak Verma) आणि रिंकू सिंह (Rinku Singh) या चार खेळाडूंचं तोंडभरून कौतूक केलंय. त्यामुळे आता काळात टीम इंडियाच्या महत्त्वाच्या दौऱ्यांसाठी या युवा खेळाडूंची वर्णी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



दरम्यान, आयपीएलच्या एलिमिनेटर (LSG vs MI) सामन्यात युवा खेळाडूने चमक दाखवली त्याचं नाव आकाश मधवाल (Akash Madhwal). आकाशने आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर 5 रन्स देऊन फक्त 5 विकेट काढल्या. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सने क्वालिफारच्या दुसऱ्या (Qualifier 2) सामन्यात प्रवेश मिळवला आहे. अशातच आता त्यांचा आगामी सामना गुजरात टायटन्ससह (Gujarat Titans vs Mumbai Indians) होणार आहे.