IND vs SA T20 World Cup 2024 Final: आज म्हणजेच 29 जून रोजी भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी-20 वर्ल्डकपचा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 8 वाजता बार्बाडोसमध्ये हा सामना रंगणार आहे. या मेगा स्पर्धेत दोन्ही टीम आतापर्यंत अपराजित राहिल्या आहेत. त्यामुळे या जेतेपदाच्या लढतीत थराराचा अजूनच वाढला. एकीकडे दक्षिण आफ्रिका चोकर्सचा डाग हटवण्याचा प्रयत्न करणार आहे तर दुसरीकडे टीम इंडियाच्या चाहत्यांना रोहित शर्माला ट्रॉफी उचलताना पाहायचं आहे. पण या ऐतिहासिक सामन्यापूर्वी टीम इंडियाने काही आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. जाणून घेऊया हे निर्णय नेमके काय आहेत. 


टीम इंडियाने प्रॅक्टिस सेशन केलं रद्द


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने फायनलपूर्वी टीम इंडियाबाबत अधिकृतपणे काही अधिकृत प्रकाशन जारी केलं होतं. ज्यामध्ये अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाची पत्रकार परिषद होणार नसल्याचे सांगण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे टीम इंडियाने सराव सत्रही रद्द केल्याचं सांगण्यात आलं. टीम इंडियाने आपला सेमीफायनलचा सामना 27 जून रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला होता, जो खेळण्यास पावसामुळे उशीर झाला होता. दरम्यान टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने घेतलेल्या निर्णयांमुळे चाहते मात्र हैराण झाले आहेत.


का घेतला असा निर्णय?


आयसीसीनुसार, फायनलसाठी बार्बाडोसला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाची पत्रकार परिषद घेण्यात आली. याशिवाय उर्वरित खेळाडूंना लक्षात घेऊन सराव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यापूर्वी सराव करण्याऐवजी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


दक्षिण आफ्रिकेच्या टीमची होणार प्रेस कॉन्फ्रेंस


29 जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची पत्रकार परिषद होार आहे. याशिवाय त्यांचं प्रॅक्टिस सेशनही होणार असल्याची माहिती आहे. दक्षिण आफ्रिकेने इतिहासात प्रथमच वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारून इतिहास रचला आहे. त्यामुळे आता कोणती टीम T20 वर्ल्डकपवर नाव कोरणार आहे हे पाहावं लागणार आहे.