CSK vs KKR IPL 2023: एम एस धोनीचे ( MS Dhoni )  चाहते केवळ भारतात नाही तर जगभरात आहे. सध्या सुरु असलेला आयपीएलचा 16  ( IPL 2023 ) वा सिझन हा धोनीचा शेवटचा सिझन असल्याचं मानलं जातंय. याबाबत रविवारी झालेल्या सामन्यात धोनीने देखील त्याच्या कृतीतून याबाबत संकेत दिले आहेत. जर आयपीएलचा हा सिझन ( IPL 2023 ) धोनीचा ( MS Dhoni ) शेवटचा असेल तर रविवारी झालेला सामना हा चेपॉकवरील त्याचा शेवटचा सामना ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी चेपॉकच्या मैदानावर आयपीएलमधील 61 ( IPL 2023 ) वा सामना खेळण्यात आला. चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) यांच्यात हा सामना रंगला होता. दरम्यान सामना जरी चेन्नईच्या टीमने हरला असला तरीही सामन्यानंतर धोनीच्या एका कृत्याने चाहत्यांची मनं जिंकली. 


चेपॉकवर झालेल्या पराभवानंतर धोनीने निवृत्तीचे संकेत देत संपूर्ण ग्राऊंडला एक फेरी मारली. यावेळी त्याने स्टेडियममध्ये बसलेल्या चाहत्यांसाठी बॉल आणि टी-शर्ट देखील फेकली. चाहते धोनीचा आवाज ऐकण्यासाठी खूप उत्सुक होते. मात्र संपूर्ण स्टेडियममध्ये प्रंचड आवाज आणि गोंधळ सुरु होता. यावेळी धोनीने असं काही केलं, ज्यामुळे चाहते अक्षरशः त्याच्यावर फिदा झालेत.  


धोनीचा फोटो होतोय व्हायरल


चेपॉकमध्ये झालेल्या सामन्यानंतर सोशल मीडियावर धोनी साऊंड सिस्टिमचा आवाज वाढवताना दिसला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होताना दिसतोय. चाहत्यांचा आवाज इतका होता की, त्यामुळे धोनीचं माईकवरील बोलणंही ऐकू येत नव्हतं. स्टेडियममध्ये इतका आवाज होता की त्याला साऊंड सिस्टीमचा आवाज वाढवणं भाग होतं. 



गावस्करांना धोनीने दिला ऑटोग्राफ


कोलकाता विरूद्धच्या सामना संपल्यानंतर धोनी ग्राऊंडवर फेरफटका मारत असताना सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) त्याला भेटायला आला. यावेळी त्यांनी शर्टवर ऑटोग्राफ मागितला. धोनी देखील गावसकरांच्या शर्टवर आपली सही दिली. 


कोलकाताकडून चेन्नईचा चेपॉकवर पराभव


रविवारी झालेल्या सामन्यात कोलकात्याने चेन्नईचा चेपॉकच्या मैदानावर पराभव केला. कोलकात्याने 6 विकेट्सने चेन्नईला धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना कोलकात्याला 145 रन्सचं लक्ष्य देण्यात आलं होतं. ज्याच्या विरोधात कोलकात्याच्या टीमने सामना 9 बॉल बाकी असताना 6 विकेट्सने जिंकला. या पराभवामुळे चेन्नईने अजून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलेलं नाही.