दिल्ली हिंसाचारावर रोहित शर्माची प्रतिक्रिया
दिल्ली हिंसाचाराबाबत रोहित शर्माने व्यक्त केली भावना
मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) ने दिल्ली सिंहाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत जो हिंसाचार होतोय तो काही योग्य नाही. रोहित शर्माने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रोहित शर्माने ट्विटरवर लिहिलं आहे की,'दिल्लीत काही चांगल दृष्य नाही. आशा आहे की, लवकरच सगळं सुरळीत होईल.' रोहित शर्माने दिल्ली हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेट विश्वातून आलेली ही पहिली प्रतिक्रिया आहे.
दिल्लीत सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये रविवारी हिंसाचार झाला. या हिंसाचारात २७ जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. दिल्लीत झालेला हिंसाचार चिंतेचा विषय असून, केंद्राने जाणीवपूर्वक ७२ तासात कारवाई केली नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नीट हाताळली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्काराला बोलवा, तरच लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. कारण पूर्ण प्रयत्न करुनही दिल्ली पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
रोहित शर्माला न्यूझीलंड विरूद्धच्या पाचवा टी 20 सामन्यात दुखापत झाली होती. यानंतर तो वनडे आणि टेस्ट सीरिजमधून बाहेर गेला.