या व्हीडिओत दिसतेय यापेक्षा चांगली बॉलिंग कुणीही करू शकतो, व्हिडीओ
जगातील सर्वात खराब बॉलर आणि त्याची बॉलिंग पाहा...एका झटक्यात...दुसऱ्याची गरज पण पडणार नाही
मुंबई: IPLच्या सामन्यांना तुफान रंगत आली आहे. दोन सामने जबरदस्त झाले. आता तिसरा सामना KKR विरुद्ध SRH चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याआधी एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत आपण सर्वात वेगवान गोलंदाजी करतानाचे व्हिडीओ आणि रेकॉर्ड ऐकले असतील. साधा विचार करायचा तर अगदी गल्लीतल्या खेळातही वेगानं चेंडू फेकल्याचे किस्से ऐकले असतील. पण हा व्हिडीओच खूप अजब आहे.
हा व्हिडीओ पाहून एक क्षण तुम्हाला वाटेल हा स्लो मोशन आहे पण नाही. अंदाज चुकण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे प्रत्यक्ष सामन्यादरम्यान असा प्रकार घडला आहे. या महिला गोलंदाजाने सर्वात स्लो बॉल टाकण्याचा अजब विक्रम केला आहे. आतापर्यंत जगात 40 kmph स्लो बॉल टाकल्याचे पाहिल्याचा विक्रमही या महिला गोलंदाजाने मोडला आहे. या गोलंदाज महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एक साधारण विचार करायचा झाला तर गल्लीत क्रिकेट खेळाताना बॉलिंगचा कमीत कमी अॅव्हरेज स्पीड 60 असतो. या महिलेनं तर हद्दच गाठली आहे. 38kmph च्या स्पीडनं बॉलिंग केली. या महिलेनं टाकलेल्या बॉलला मारण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या महिला खेळाडूलाही पुढे येऊन खेळावं लागलं न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघांचा सामना सुरू असताना हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून एक क्षण तुम्हालाही ही जगातील सर्वात खराब बॉलर आणि तिची सर्वात वाईट बॉलिंग वाटण्याची शक्यता आहे.