PAK vs AUS, David Warner : वर्ल्ड कपच्या वॉर्मअप सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 352 धावांचं आव्हान पार करताना पाकिस्तानची (Austrelia vs Pakistan) दैना उडाल्याचं पहायला मिळतंय. सलामीवीर फखर जमान आणि इमाम-उल-हक यांनी मैदानातून लवकर काढता पाय घेतला. तर त्यानंतर आलेल्या अब्दुल्ला शफीक याला देखील लवकर माघारी परतावं लागलं. या सामन्यात फक्त कॅप्टन बाबर आझमला (Babar Azam) चांगली खेळी करता आलीये. मात्र, या सर्व गोष्टींमध्ये सध्या चर्चे सुरूये ती डेव्हिड वॉर्नर याची. डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) डोक्यातून पुष्पाचं (Pushpa) खुळ गेलं नसल्याचं पुन्हा एकदा पहायला मिळालंय. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेविड वॉर्नर (David Warner) हा साऊथ इंडस्ट्रीतला सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याचा खुप मोठा फॅन आहे.अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राईज (Pushpa The rise) सिनेमावरील गाण्यावर त्याने अनेक रिल्स देखील तयार केलेत. आयपीएल सामन्यात तो हैदराबाद संघातून खेळत असल्याने तो अल्लू अर्जून आणि या सिनेमांशी जोडला गेला. त्यामुळेच कधी कधी त्याच्यावर भारतीय सिनेमांचा आणि अल्लू अर्जूनचा फिव्हर चढलेला दिसतो. अशातच आता लाईव्ह सामन्यात देखील त्याने पुष्पाचा फिव्हर दाखवलाय.


पाहा Video


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारीत 50 षटकात 7 गडी गमावून 351 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी केवळ 12.2 षटकांत 83 धावा करत शानदार सुरुवात केली. ग्लेन मॅक्सवेलने 71 चेंडूत शानदार 77 धावा केल्या, परंतु कॅमेरॉन ग्रीन आणि जॉश इंग्लिस यांनी अनुक्रमे 40 चेंडूत 50 आणि 30 चेंडूत 48 धावा केल्या. यांच्या फलंदाजीच्या दोरावर कांगारूंनी 351 धावांची खेळी केली आहे.


आणखी वाचा - वर्ल्ड कपआधी Rashid Khan ची मॅजिकल सुरुवात, बॉल इतका आत वळला की... बॅटरही झाला शॉक; पाहा Video


ऑस्ट्रेलिया: पॅट कमिंस (कॅप्टन), स्टीव स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन एबॉट, कॅमरन ग्रीन, जॉश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, मिच मार्श, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर, एडम झॅम्पा, मिशेल स्टार्क.


पाकिस्तान : शादाब खान (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम.