AFG vs SL : वर्ल्ड कपआधी Rashid Khan ची मॅजिकल सुरुवात, बॉल इतका आत वळला की... बॅटरही झाला शॉक; पाहा Video

Rashid Khan magical Delivery : वर्ल्ड कपच्या तोंडावर खेळवल्या जात असलेल्या वॉर्मअप सामन्यात राशिद खान याने जादुई गोलंदाजी केली.   

Updated: Oct 3, 2023, 07:37 PM IST
AFG vs SL : वर्ल्ड कपआधी Rashid Khan ची मॅजिकल सुरुवात, बॉल इतका आत वळला की... बॅटरही झाला शॉक; पाहा Video title=
Rashid Khan magical Delivery in AFG vs SL world cup

Rashid Khan, AFG vs SL : क्रिकेटच्या महाकुंभाला (World Cup 2023) आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. त्याआधी आता वॉर्मअप सामने खेळवले जात आहेत. श्रीलंका आणि अफगाणिस्तान (Afghanistan vs Sri Lanka) यांच्यात सराव सामना खेळवला जातोय. या सामन्यात कुसल मेंडिसचा (Kusal Mendis) घातक रूप सर्वांना पहायला मिळालं. वनडाऊनला आलेल्या मेंडिसने 87 चेंडूत 158 धावा कुटल्या. त्यात 19 फोर अन् 9 गगनचुंबी षटकारांचा समावेश आहे. या सामन्यात आणखी एक गोष्ट पहायला मिळाली. ती म्हणजे राशिद खानची (Rashid Khan) स्पेशल डिलिव्हरी...

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरूवात नेहमीप्रमाणे खराब झाली. करुनारत्ने लवकर बाद झाल्यानंतर कुशल मेंडिस मैदानात आला. त्याने एक बाजू सांभाळून ठेवली अन् आक्रमक धावा करण्यास सुरूवात केली. त्यानंतर समाराविक्रमा आणि असलंका यांनी देखील साथ दिली. मात्र, अफगाणि स्पिनर्सने श्रीलंकेची एक बाजू वेळेवेळेत मोडून काढली. या सामन्यात राशिद खानचा एक स्पेल सर्वांना आवडला. निसंका बाद झाल्यानंतर  कुशल मेंडिस आणि समाराविक्रमा यांची जोडी जमली होती. 

दोघांनी 50 धावांची पार्टनरशीप उभा केल्यानंतर अफगाणिस्तानसाठी आव्हान अवघड जाणार होतं. पीचमधून मदत मिळत नव्हती. त्यावेळी कॅप्टन हशमतुल्ला शाहिदी याने प्रमुख गोलंदाज राशिद खान याच्याकडे बॉल सोपावला.  राशिदने 35 व्या ओव्हरत्या तिसऱ्या बॉलवर समाराविक्रमाची विकेट काढली. बॉल आत वळला अन् बॅटरला बॉलचा अंदाज देखील आला नाही. त्यामुळे आता भारताच्या मैदानात राशिद आपल्या फिरकीची जादू दाखवणार, असं म्हटलं जातंय.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

श्रीलंकेचा संघ : पाथुम निस्संका, कुसल मेंडिस (कर्णधार), सदीरा समाराविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डीसिल्वा, दिमुथ करुणारत्ने, दुनिथ वेल्लालगे, दुशन हेमंथा, लहिरू कुमारा, कसुन राजिथा, दिलशान मधुशंका, मथीशा पथिराना.

रहमानउल्ला गुरबाज (wk), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला झद्रान, हशमतुल्ला शाहिदी (c), रहमत शाह, मोहम्मद नबी, रशीद खान, इकराम अलीखिल, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, अजमातुल्ला उमरझाई, अब्दुल रहमान, रियाझ हसन, फजलहक फारुकी, नूर अहमद.