पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) पहिल्या सेमी फायनल लढतीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा (PAK vs NZ) 7 गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानने फायनलमध्ये धडक मारली आहे. यानंतर पाकिस्तानच्या विजयाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरू असताना आता एक मिस्ट्री गर्ल (Mystery Girl) देखील चर्चेत आली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे ही मिस्ट्री गर्ल कोण आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : सुर्या पुन्हा तळपला! आयसीसी रॅकींगमध्ये गाठलं आभाळ  


आजच्या सामन्यात न्यूझीलंडने (New zealand) टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता.मात्र हा निर्णय़ त्यांच्या सार्थकी ठरला नाही. कारण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांनी 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावत 152 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानसमोर 153 धावांचे लक्ष्य होते.


हे ही वाचा : भारत विरूद्द इंग्लंड सामन्यात पाऊस पडला तर...कस असेल समीकरण?


न्युझीलंडने (New zealand) दिलेल्या 152 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तानची (Pakistan) सुरुवात चांगली झाली होती. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून न्युझीलंडवर 7 विकेट राखत विजय मिळवला. या विजयानंतर पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचली आहे. 


हे ही वाचा : T20 World Cup मध्ये 'या' भारतीय महिला अँकरच्या ग्लॅमरची चर्चा, पाहा PHOTO


मिस्ट्री गर्लचे फोटो व्हारयल? 


पाकिस्तानच्या (Pakistan) विजयानंतर सोशल मीडियावर जल्लोष सुरु आहे. अनेकजण भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) आमने-सामने येण्याचा अंदाज लावतायत. त्यात आता एका मिस्ट्री गर्लचा (Mystery Girl) फोटो व्हायरल होत आहे. अनेकजण तिचे हे फोटो पोस्ट करून पाकिस्तानच्या विजयाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र पाकिस्तानच्या विजयापेक्षा तिची खुप चर्चा सुरु आहे. 



कोण आहे मिस्ट्री गर्ल?


ही मिस्ट्री गर्ल (Mystery Girl) पाकिस्तानची फॅन आहे. तिचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तान संघ जिंकताना तिने स्टेडीअममध्ये दिलेल्या अनेक सुंदर ऱिअॅक्शनचे फोटो आता व्हायरल होत आहे. मात्र ही मिस्ट्री गर्ल (Mystery Girl) कोण आहे, याची माहिती मिळू शकली नाही. 



दरम्यान आता उद्या भारत आणि इंग्लंडमध्ये (India vs England) सेमी फायनलची लढत होणार आहे. या लढतीत विजयी होणारा संघ फायनलमध्ये पाकिस्तानशी भिडणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.