IND vs ENG : भारत विरूद्द इंग्लंड सामन्यात पाऊस पडला तर...कस असेल समीकरण?

IND vs ENG T20 World Cup 2nd Semi Final : भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात पाऊल पडला तर... कोणता संघ थेट फायनलमध्ये जाणार? तुम्हाला माहितीय का?

Updated: Nov 10, 2022, 11:27 AM IST
IND vs ENG : भारत विरूद्द इंग्लंड सामन्यात पाऊस पडला तर...कस असेल समीकरण? title=

Ind vs Eng T20 World Cup Latest Updates: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्या सेमी फायनल लढतीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा (PAK vs NZ) 7 गडी राखून पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानने फायनलमध्ये धडक दिली आहे. आता उद्या गुरूवारी 10 नोव्हेंबरला टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये  (India Vs England) दुसरी सेमी फायनल लढत होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. मात्र तत्पुर्वी उद्याच्या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया विरूद्ध इंग्लंड सामन्यात जर पाऊस पडला तर कस समीकरण असणार आहे, हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : PAK vs NZ सामन्यात दिसली मिस्ट्री गर्ल, PHOTO होतायत व्हायरल

सामन्यावर पावसाचे सावट

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup)  टीम इंडिया आणि इंग्लंड (India Vs England) उद्या दुसरा सेमी फायनल सामना अॅडलेडमध्ये खेळणार आहेत. या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे पावसामुळे एका रोमांचक सामन्यावर पाणी फेरण्याची शक्यता आहे. अनेल सामन्यात असे झाले आहे, त्यामुळे या सामन्यात देखील असे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की, अशा परीस्थितीत कोणता संघ फायनलमध्ये जाणार आहे.  

हे ही वाचा : सुर्या पुन्हा तळपला! आयसीसी रॅकींगमध्ये गाठलं आभाळ  

...तर हा संघ थेट फायनलमध्ये 

जर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India Vs England) सामना पावसामुळे रद्द झाला, तर सुपर-12 च्या गटात अव्वल असलेल्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. याचा अर्थ असा की जर भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) सामना पावसामुळे रद्द झाला तर भारत फायनलमध्ये प्रवेश करेल. कारण टीम इंडियाने ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.  

तसेच आयसीसीने नॉक आऊट सामन्यांसाठी राखीव दिवस देखील ठेवला आहे. जेव्हा नियोजित दिवशी 5-5 ओव्हर्स खेळली जाणार नाहीत तेव्हा हा दिवस मोठ्या प्रमाणावर वापरला जाईल.

हे ही वाचा : T20 World Cup मध्ये 'या' भारतीय महिला अँकरच्या ग्लॅमरची चर्चा, पाहा PHOTO

हवामानाचा अंदाज काय?

Accuweather च्या अहवालानुसार, 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेडमध्ये दिवसभरात पावसाची शक्यता 25 टक्के वर्तवली जात आहे. वातावरण खूप थंड असणार आहे. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची 71 टक्के शक्यता आहे. त्याचवेळी ताशी 35 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हवामानाचा हा अहवाल पाहता या सामन्यात गोलंदाज खूप फायदा होणार आहे.  

दरम्यान आता हा सामना पावसामुळे रद्द होतो की, व्यवस्थित पार पडतो? याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.  

दोन्ही संघ 

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, टायमल मिल्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, अॅलेक्स हेल्स.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी