ICC Rankings : सुर्या पुन्हा तळपला! आयसीसी रॅकींगमध्ये गाठलं आभाळ

सुर्यकुमार अकेला ही काफी है! पाकिस्तानला आयसीसी रॅकींगमध्येही पछाडलं

Updated: Nov 9, 2022, 10:27 PM IST
 ICC Rankings : सुर्या पुन्हा तळपला! आयसीसी रॅकींगमध्ये गाठलं आभाळ   title=

मुंबई : ICC Rankings टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) तो त्याच्या बॅटीने कमाल कामगिरी करताना दिसत आहे.त्याच्या या उत्कृष्ट खेळीने टीम इंडिया (Team India) सेमी फायनल पर्यंत पोहोचली आहे. तसेच वैयक्तित कामगिरीतही त्याने भल्या भल्या खेळाडूंना पछाडलं आहे. याचाच फायदा त्याला आयसीसी क्रमावारीत (ICC Ranking) झाला आहे. आयसीसी क्रमवारीत त्याने अव्वल स्थान गाठलंय.  

हे ही वाचा : PAK vs NZ सामन्यात दिसली मिस्ट्री गर्ल, PHOTO होतायत व्हायरल

मोहम्मद रिझवानला टाकले मागे 

सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. गेल्या वेळीच तो अव्वल स्थानी पोहोचला होता. त्याने पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) मागे टाकले होते. गेल्या अनेक महिन्यापासून रिझवान अव्वल स्थानावर होता. मात्र आता सुर्यकुमार यादव रॅकींगमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला आहे. 

हे ही वाचा : भारत विरूद्द इंग्लंड सामन्यात पाऊस पडला तर...कस असेल समीकरण?

बॅट्समनची क्रमवारी?

टी20 रॅकींगमध्ये सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 869 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्यानंतर न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे दुसऱ्या, तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चौथ्या स्थानावर आहे. भारताचा उपकर्णधार केएल राहुलने पाच स्थानांची प्रगती करत 16व्या स्थानावर पोहोचला आहे.याशिवाय भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचेही मोठे नुकसान झाले आहे. फलंदाजांच्या टॉप-10 क्रमवारीतून कोहलीला वगळण्यात आले आहे. विराट कोहली 11व्या तर भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा 18व्या स्थानावर आहे

दरम्यान सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) T20 वर्ल्ड कपमध्ये  (T20 World Cup) आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये 200 च्या जवळपास स्ट्राइक रेटने 225 धावा केल्या आहेत. तो करिअरमधील सर्वोत्तम 869 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. भारताच्या शेवटच्या गट सामन्यात यादवने 25 चेंडूत 61 धावा केल्या होत्या. आता सेमी फायनल आणि फायनलमध्ये तो कशी कामगिरी करतो हे पहावे लागणार आहे.  

गोलंदाजांची क्रमवारी

सूर्यासोबतच (Suryakumar Yadav) भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनेही (Arshdeep Singh)  टी-20 गोलंदाजी क्रमवारीत आपला ठसा उमटवला आहे. अर्शदीप सिंगने कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले आहे. तो 23 व्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजीत अर्शदीप चार स्थानांनी 23व्या स्थानावर पोहोचला आहे, तर पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी त्याच्या एका स्थानावर आहे. फिरकीपटू आर अश्विन पाच स्थानांनी चढून 13व्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) अव्वल स्थानावर आहे, ज्याने या स्पर्धेत 15 बळी घेतले. अष्टपैलूंच्या क्रमवारीत झिम्बाब्वेचा सीन विल्यम्स पहिल्या दहामध्ये पोहोचला आहे.