मुंबई : टीम इंडिया (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship Final 2021) अंतिम सामन्याच्या दृष्टीने तयारीला लागली आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडिया मुंबईत क्वारंटाईन आहे. याआधी कर्णधार (Virat Kohli) विराट कोहलीने क्रिकेट विश्वातील सर्वाधिक धोकादायक गोलंदाजाचं नाव सांगितलं आहे. (Pakistan Former Bowler Wasim Akram is Most Dangerous says Team India captain virat Kohli


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली काय म्हणाला?


विराट आपल्या चाहत्यांसोबत इंस्टाग्रामद्वारे संवाद साधत होता. या दरम्यान "तुला कोणत्या गोलंदाजाला खेळायला आव्हानात्मक ठरलं असतं", असा प्रश्न एका चाहत्याने विराटला विचारला. "पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमच्या गोलंदाजीवर खेळणं हे आव्हानात्मक ठरलं असतं", असं विराटने उत्तर दिलं. अक्रमला  स्विंगचा किंग म्हटलं जायचं. आजही त्याची गणना स्टार गोलंदाजांमध्ये केली जाते. अक्रमने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत वनडेमध्ये 502 तर कसोटीमध्ये 414 विकेट्स घेतल्या आहेत.



पाकिस्तानचा यशस्वी क्रिकेटपटू


अक्रम पाकिस्तानच्या यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. अक्रमने बॉलिंगसह बॅटिंगनेही धमाका केला. त्याने कसोटीमध्ये 2 हजार 898 तर वनडेमध्ये 3 हजार717 धावा केल्या. अक्रमने काही काळ पाकिस्तानच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली. अकरमला 2002 मध्ये विजडनतर्फे सर्वकालीन सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून गौरवलं होतं.


संबंधित बातम्या 


IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांआधी मुंबई इंडियन्सच्या चिंतेत वाढ, नेमकं कारण काय?


India Tour England | "टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर विराटवर अवलंबून नाही"