मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे. या सामन्यांचे आयोजन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. कोरोनामुळे बीसीसीआयने 2 मे ला 29 सामन्यांच्या आयोजनानंतर हा मोसम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता उर्वरित सामन्यांच्या आयोजनाच्या निर्णयानंतर आयपीएलमधील सर्वात यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणारा ऑलराऊंडर कायरन पोलार्ड तसेच इतर खेळाडू हे सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नाहीये किंवा ते माघारही घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मुंबईसह इतर फ्रँचायजींसाठी ही डोकेदुखी वाढवणारी बातमी आहे.(ipl 2021 mumbai indians all rounder player kieron pollard will be not availbale for few matches in uae)
नक्की प्रकरण काय?
आयपीएलच्या या उर्वरित सामन्यांना 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यात वेस्टइंडिजमध्ये सीपीएल अर्थात कॅरेबियन प्रिमीअर लीग स्पर्धेचं (Caribbean Premier League) आयोजन हे 28 ऑगस्ट ते 19 सप्टेंबरमध्ये करण्यात आलंय. या स्पर्धेमुळे पोलार्डला मुंबईकडून काही सामन्यांना मुकावे लागू शकते. पोलार्डसह या सीपीएलमध्ये ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, सुनील नारायण यासारखे स्टार खेळाडूही सहभागी होणार आहेत. विडिंजचे खेळाडू हे आयपीएलमधील मुख्य आकर्षण असतात.
विंडिजचे उंचपुरे खेळाडू हे बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग या तिनही आघाड्यांवर दमदार कामगिरी करतात. त्यांचा इतर खेळाडूंपेक्षा हटके अंदाज पाहायला मिळतो. सीपीएलची सांगता आणि आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात ही जवळपास एकाच तारखेला अर्थात 19 सप्टेंबरला होणार आहे. सीपीएल संपल्यानंतर खेळाडूंना क्वारंटाईन रहावं लागेल. या नियमांमुळे हे खेळाडू आयपीएलमध्ये उशिरा उपस्थित होतील किंवा सहभागीही होता येणार नाही. यामुळे या खेळाडूंना वेळेत सहभागी होता यावं, यासाठी बीसीसीआय सीपीएलच्या वेळापत्रकात योग्य बदल करण्यासंदर्भात वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाशी चर्चा करणार आहे.
पण विंडीज क्रिकेटने बीसीसीआयची ही मागणी मंजूर केली तरच या खेळाडूंना आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात वेळेवर उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे विंडीज क्रिकेट बोर्ड बीसीसीआयची ही मागणी मान्य करते की फेटाळते, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
पोलार्डची शानदार कामगिरी
पोलार्डने मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात एकहाती शानदार विजय मिळवून दिला होता. हा सामना 1 मे रोजी खेळवण्यात आला होता. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला विजयासाठी 219 धावांचे मजबूत आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने पोलार्डच्या झंझावाती खेळीच्या जोरावर शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं.
पोलार्डने 34 चेंडूत 6 फोर आणि 8 खणखणीत सिक्सच्या मदतीने 87 धावांची नाबाद खेळी केली होती. मुंबईने 14 व्या मोसमातील पहिल्या टप्पा स्थगित होण्यापर्यंत 7 सामने खेळले होते. यापैकी 4 सामन्यात मुंबईने विजय मिळवला होता. तर 3 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई ताज्या आकडेवारीनुसार 8 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.
संबंधित बातम्या :
India Tour England | "टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर विराटवर अवलंबून नाही"
Corona ची तिसरी लाट तारीख सांगून येणार नाही, गाव कोरोनामुक्तीचा संकल्प करा : मुख्यमंत्री