Arshad Nadeem : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा गोल्डन बॉय अर्शद नदीम (Arshad Nadeem) पाकिस्तानात हिरो बनला आहे. सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावल्यानंतर त्याच्या फॅन फॉलोईंगमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. ऑलम्पिकमध्ये पाकिस्तानने (Pakistan) 32 वर्षांनंतर पदक तर 40 वर्षांनंतर सुवर्ण पदक पटकावलं आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर अर्शद नदीमचं पाकिस्तानात जोरदार स्वागत करण्यात आलं. त्याच्यावर बक्षिसांचा पाऊस पडतोय. अनेक उद्योगपती, नेत्यांनी अर्शद नदीमला बक्षीसं जाहीर केली आहेत. यात काही विचित्र बक्षीसही मिळत आहेत, ज्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सासऱ्याने दिली म्हैस
अर्शद नदीमुने सुवर्ण पदक पटकावल्यानंतर त्याच्या सासरी जल्लोष साजरा करण्यात आला. अर्शद नदीमला भेट म्हणून त्याच्या सासऱ्यांनी त्याला चक्क एक म्हैस दिली. अर्शद नदीमच्या सासऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गावात म्हैस भेट देणं हे मौल्यवान आणि सन्मानजनक मानलं जातं. हे कमी की काय पाकिस्तानचे उद्योगपदी अली शेखानी यांनी अर्शद नदीमला एक कार गिफ्ट करण्याची घोषणा केली आहे. 


ही कार गिफ्ट
अली शेखानी हे पाकिस्तानचे मोठे उद्योगपती मानले जातात. त्यांनी अर्शद नदीम यांचं कौतुक केलं असून त्याला एक कार गिफ्ट करण्याची घोषणाही केली. अर्शद नदीमला ऑल्टो कार दिली जाणार आहे. ऑल्टो कार ही पाकिस्तानातली सर्वात स्वस्त कार आहे. अली शेखानी यांनी घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. ऑल्टो कार आकाराने अतिशय लहान आहे. धिप्पाड शरीरयष्टीचा नदीम या कारमध्ये बसू तरी शकेल का असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. 


एका भारतीय युजरने अली शेखानी यांची खिल्ली उडवत आमच्या इथे ऑल्टो कार कॅब म्हणूनही बूक केली जात नसल्याचं म्हटलं आहे. तर एका युजरने द्यायचीच होती तर महिंद्रा स्कॉर्पिओ द्यायची असं म्हटलं आहे. 


नदीमला करोडो रुपायंचं बक्षीस
अर्शद नदीला आतापर्यंत 150 मिलिअन पाकिस्तान रुपयांची बक्षिसं मिळाली आहे. भारतीय रुपयात ही रक्कम 4.50 कोटी इतकी होते. पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मरियम नवा यांनी नदीमला 100 मिलिअन पाकिस्तान रुपयांची घोषणा केली आहे. याशिवाय सिंध प्रांताचे राज्यपाल सरदार सलीम हैदर खान यांनी नदीमला 2 मिलिअन पाकिस्तानी रुपयांची घोषणा केलीय. नदीमला सर्वोच्च नागरिक पुरस्कारानेही सन्मात केलं जाणार आहे. पाकिस्तानी अभिनेत्यानेही नदीमला पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केलीय.