लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने श्रीलंकेला हरवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. या सामन्यात पाकिस्तानचा विकेटकीपर सर्फराजचा खोटारडेपणा दिसून आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३४व्या ओव्हरमध्ये सर्फराजने श्रीलंकेच्या गुणरत्नेचा कॅच सोडला. मोहम्मद आमिरने टाकलेला बॉल गुणरत्नेच्या बॅटच्या किनाऱ्याला लागला. सर्फराजने  जबरदस्त डाय मारत कॅच घेण्याचा प्रयत्न केला मात्र अखेरच्या क्षणी त्याच्या हातातून बॉल निसटला. 


मात्र त्यानंतरही त्याने गुणरत्ने बाद झाल्याचे जोरदार अपील आणि थर्ड अंपायरकडून रिव्ह्यूची मागणी केली. रिप्लेमध्ये पाहिल्यास बॉल सर्फराजच्या हातातून निसटल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मात्र त्यानंतरही त्याने थर्ड अंपायरकडे रिव्ह्यू मागितला.