Praveen Kumar On Lalit Modi : टीम इंडियाला खूप कमी स्विंग गोलंदाज मिळाले. आपल्या घातक स्विंग गोलंदाजीने अनेक दिग्गज फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवणाऱ्या प्रवीण कुमारला (Praveen Kumar) आजही अनेकजण विसरले नसतील. हाताचा पिळा घालणाऱ्या बॉलिंग अॅक्शनमुळे प्रविण नेहमी लक्षात राहतो. त्याच्या इनस्विंग गोलंदाजीचा धार आजही कोणत्याही गोलंदाजाला जमली नाही. अशाच प्रविण कुमारने एका दिलेल्या मुलाखतीत (Praveen Kumar Interview) अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यामुळे आता क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच प्रवीण कुमारने आयपीएलचे निर्माते ललित मोदी (Lalit Modi) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला Praveen Kumar ?


मला आरसीबीकडून खेळायचं नव्हतं कारण बंगळुरू शहर माझ्या घरापासून खूप लांब होतं, मला इंग्रजी येत नव्हतं आणि जेवणही माझ्या आवडीचं नव्हतं. दिल्ली मेरठपासून खूप जवळ आहे, त्यामुळे मला अधूनमधून माझ्या घरी जाण्याची संधी मिळाली असती. दिल्ली मेरठपासून अगदी जवळ असल्‍याने मला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात सामील व्हायचं होतं. मात्र, मला एका कागदावर सही करायला लावली. मला त्यावेळी माहित नव्हतं की तो कागद आयपीएल कराराचा आहे. मला जेव्हा नंतर समजलं तेव्हा मी आयपीएलचे अधिकारी ललित मोदी यांना सांगितलं की, मला आयसीबी नाही तर दिल्लीकडून खेळायचं आहे. तेव्हा आयपीएल नुकतीच सुरू झाली होती. तेव्हा मला मदत करण्‍याऐवजी ललित मोदींनी मला फोन करून माझी कारकीर्द संपवण्याची धमकी दिली होती, असा खळबळजनक दावा प्रवीण कुमार याने केला आहे.


पाकिस्तानी गोलंदाज बॉल टॅम्परिंग जास्‍त करतात, असा खळबळजनक आरोप देखील प्रवीण कुमारने केलाय. पाकिस्तानी गोलंदाज त्यांच्या रिव्हर्स स्विंगसाठी बॉलसोबत छेडछानी करतात, असं प्रवीण म्हणतो. पाकिस्तानी खेळाडू रिव्हर्स स्विंग मिळवण्यासाठी चेंडू एका बाजूने स्क्रॅच करत असायचे, असंही प्रवीण म्हणाला आहे. प्रवीणने या मुलाखतीत टीम इंडियाच्या तत्कालिन सिनियर खेळाडूंना देखील शिंगावर घेतलं होतं.


मला सांगण्यात आलं होतं की पीके ड्रिंक करायची नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही.. सिनियर खेळाडू होते, ते सगळं करत होते. मात्र, नाव माझं खराब करत होते. पीके दारु पितो अन् इतर गोष्टी सांगितल्या जात होत्या. हमाम में सब नंगे हैं, असं म्हणत प्रविण कुमारने टोला लगावला. त्यावेळी त्याने धोनीचं कौतूक देखील केल्याचं पहायला मिळालं.


दरम्यान, प्रवीण कुमारने टीम इंडियासाठी 6 कसोटी खेळल्या आहेत. ज्यात त्याने 27 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 68 एकदिवसीय सामन्यांमध्ये 77 विकेट्स घेतल्या आहेत, तर 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 8 विकेट घेतल्या आहेत.