मुंबई : येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. या दरम्यान सर्वंच संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्याचं वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. असे असा असताना एका स्टार खेळाडूने सर्वांत वेगवान अर्धशतक ठोकलं आहे. या खेळाडूच्या अर्धशतकी खेळीचं कौतूक होतेय. हे कौतूक होत असताना या खेळाडूला टीम इंडियाच्या टी20 स्क्वाँडमध्ये (T20 Squad)  का घेतलं नाही, असा सवाल उपस्थित होतोय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : Dhanashree Verma सोशल मीडियावर होतेय ट्रोल, 'हे' आहे कारण


देशांतर्गत सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 (Syed Mushtaq Ali Trophy) चे सामने सुरु आहेत. या सामन्यात पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) 19 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं आहे. मुंबई संघातून खेळताना त्याने आसाम विरूद्ध (Mumbai vs Assam) त्याने हे अर्धशतक ठोकलं आहे. या त्याच्या अर्धशतकी खेळीचे खुप कौतूक होतेय.



दरम्यान टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup)  सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियात सूरू असलेल्या सराव सामन्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू चांगली खेळी करण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे वर्ल्ड कपपूर्वी पृथ्वी शॉने ठोकलेल्या फास्टेस फिफ्टीची चर्चा सुरू झालीय. त्याचबरोबर पृथ्वी शॉला टी20 स्क्वाँडमध्ये (T20 Squad) का संधी देण्यात आली असा सवाल आता उपस्थित होऊ लागले आहे. 


पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) या सामन्यात 134 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 13 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. तर पृथ्वी व्यतिरीक्त यशस्वी जयस्वालने 42 धावा ठोकल्या आहेत. अमन खान आणि सरफराजने 15 धावा केल्या आहेत. या बळावर मुंबईने 230 धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे आता आसाम संघासमोर आता 231 धावांचे आव्हान असणार आहे.