मुंबई : भारताची बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधूने ट्विटरच्या माध्यमातून तिच्यासोबत झालेल्या चूकीच्या वागणूकीची माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मुंबईला येताना अजितेश नावाच्या ग्राऊंड स्टाफचे तिच्यासोबतचे चूकीचे वागणे झाल्याची माहिती तिने दिली आहे. 


 सिंधूच्या ट्विटनुसार ती इंडिगो च्या 6E 608 फ्लाइटने मुंबईला येत होती. यावेळेस तिच्यासोबत ग्राऊड स्टाफने चूकीचे वर्तन केले.  ग्राऊंड स्टाफचे वर्तन फारच उद्धटपणाचे होते. इंडिगोची एअर हॉस्टेस त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्याचे वागणं अत्यंत वाईट होते. असे कर्मचारी यापुढेही राहिल्यास असे कर्मचारी सारी प्रतिष्ठा धूळीत मिसळतील असे तिनं म्हटले आहे. 
 
 सध्या बॅटमिंटनक्षेत्रात जगभरात पी.व्ही. सिंधूचा दुसरा क्रमांक लागतो. पी.व्ही सिंधूप्रमाणेच यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि हरभरज सिंग यांच्या सोबत ब्रिटीश एअरवेजदेखील चूकीच्या पद्धतीने वागली आहे.