Cricket : पृथ्वी शॉने रणजीत विक्रम केला, पण बीसीसीआने दखलही घेतली नाही... सोशल मीडिआवर Troll
रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने विक्रम रचला आणि पुन्हा एकदा टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे. पण बीसीसीआयच्या एका कृतीने सर्वसामान्य क्रिकेट चाहता पृथ्वीच्या विक्रमापासून दूर राहिला
Ranji Trophy : रणजी ट्रॉफी 2022-23 चा हंगाम सुरु आहे आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच या स्पर्धेत मोठा विक्रम रचला गेला आहे. मुंबई क्रिकेट संघाकडून (Mumbai Team) खेळणाऱ्या पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) आसामविरुद्ध (Mumbai vs Asam) तब्बल 379 धावांची विक्रमी खेळी केली (Prithvi Shaw Triple Century). रणजी ट्रॉफी क्रिकेटच्या इतिहासात ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावांची खेळी ठरली. याआधी संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) दुसऱ्या स्थानावर होते, त्यांनी 377 धावा केल्या होत्या. आसामविरुद्धच्या सामन्यात सोमवारी पृथ्वी शॉ 240 धावा काढून खेळत होता, मंगळवारी त्याने तिहेरी शतक झळकावलं आणि बघता बघता 350 धावांचा आकडाही पार केला.
पृथ्वी शॉने मोडरे रेकॉर्ड
पृथ्वी शॉची खेळी जसजशी पुढे सरकत होती, तस तसे रणजी क्रिकेटमधले एक एक विक्रम मागे पडत होते. पृथ्वीने स्वप्निल गुगाले (351*), चेतेश्वर पुजारा (352), वीवीएस लक्ष्मण (353), समित गोहेल (359*), विजय मर्चंट (359*), एमवी श्रीधर (366*) आणि संजय मांजरेकर (377) यांचा विक्रम मोडला. रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता पृथ्वी शॉ दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर महाराष्टाचे भाऊसाहेब निम्बाळकर (BB Nimbalkar) आहेत. भाऊसाहेबांनी 1948 मध्ये काठियावाडविरुद्ध खेळताना 443 धावा केल्या होत्या.
पृथ्वीने टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला
पृथ्वी शॉ टीम इंडियासाठी (Team India) 25 जुलै 2021 ला शेवटचं खेळला होता. त्यानंतर गेल्या वर्षभरात पृथ्वीची कामगिरी सातत्याने चांगली झाली आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वीने नॉर्थ-ईस्ट झोनविरुद्ध खेळताना 121 चेंडूत 113 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंड-ए विरुद्ध त्याने 77 धावांची तुफान खेळी करत मालिका जिंकून दिली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या टी20 सामन्यात त्याने अवघ्या 61 चेंडूत 134 धावांची खेळी केली. आता रणजी क्रिकेटमध्ये 379 धावांची खेळी करत पृथ्वीने टीम इंडियात आपला दावा ठोकला आहे.
पृथ्वीच्या विक्रमापासून सामन्य चाहते दूर
रणजी क्रिकेटमधल्या पृथ्वीच्या कामगिरीमुळे बीसीसीआय (BCCI) मात्र ट्रोल होत आहे. कारण पृथ्वीच्या ही कामगिरी सामान्य क्रिकेट चाहत्यांना पाहता आली नाही. कारण या सामनाचं लाईव्ह कव्हरेज दाखवण्यात आलं नव्हतं. ट्विटरव एकदोन ट्विट सोडल्यास पृथ्वी शॉच्या या विक्रमाची कुठेही वाच्यता झाली नाही. जगातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट बोर्डाने काही सामने वगळता रणजी क्रिकेटचं लाईव्ह कव्हरेज दाखवलं नाही. त्यामुळे बीसीसीआवर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे.
र्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध 175 धावांची खेळी केली होती, दुर्देवाने यासामन्याचा व्हिडिओ उपलब्ध नाही. पण ते 1983 चं वर्ष होतं. आता 2023 सुरु आहे. लहान-लहान टेनिस बॉल टुर्नामेंटही युट्यूबवर किंव मोबाईल अॅपवर लाईव्ह दाखवल्या जातात. पण भारतीय स्थानिक क्रिकेट स्पर्धा टीव्हीवर दाखवल्या जात नाहीएत. पृथ्वी शॉने इतका मोठा विक्रम रचाल पण त्याची ही खेळी सामान्य क्रिकेट चाहत्यांना पाहाता आली नाही.