Ravi Shastri Critisizes Rohit Sharma: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC Final), आगामी वनडे वर्ल्ड कप (ODI WC 2023) तोंडासमोर असताना टीम इंडियाच्या कॅप्टनला फॉर्म गवसत नसल्याचं दिसतंय. यंदाच्या आयपीएलमध्ये रोहितची (Rohit Sharma) बॅट थंडच असल्याचं दिसतंय. आत्तापर्यंतच्या सामन्यात त्याने फक्त 184 धावा केल्या आहेत, त्यामुळे आता कॅप्टनच फॉर्ममध्ये नसल्याने टीम इंडिया (Team India) जिंकणार कशी? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. दिग्गज क्रिडातज्ज्ञांनी रोहितच्या फॉर्मवर चिंता व्यक्त केली जात असताना माजी कोच रवी शास्त्री यांनी रोहितवर (Ravi Shastri On Rohit Sharma) सडकून टीका केली आहे.


काय म्हणाले रवी शास्त्री?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये असाल, जर तुम्ही धावा करत असाल, तर कर्णधार म्हणून तुमचं काम खूप सोपं होतं, चांगल्या फॉर्ममुळे कॅप्टन म्हणून खेळताना देहबोली बदलते, पण तुम्ही धावा काढत नसाल तर मैदानावरील ऊर्जा कमी होते. मग तुम्ही कोण आहात, याने काही फरक पडत नाही. कर्णधार म्हणून तुम्ही चांगली कामगिरी करणं अधिक महत्त्वाचं आहे, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) वक्तव्य यांनी केलंय.


रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कारकिर्दीचा टप्पा आणि त्याच्याकडे असलेली टीमची जबाबदारी यामुळे आता हे अवघड झालंय. सध्याचा हा संघ एक-दोन वर्षांनी उत्तम संघ होऊ शकतो, पण योग्य टीम कॉम्बिनेशन मिळविणं हे कर्णधाराचं काम आहे. कॅप्टन म्हणून त्याच्यापुढील आव्हानं दुप्पट झाली आहेत. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत कर्णधार म्हणून काम दुप्पट झालंय, असंही रवी शास्त्री यांनी म्हटलंय.


आणखी वाचा - अरेरे...टेस्ट वर्ल्ड कप जिंकणार तरी कसा? ईशानची निवड केली पण....


दरम्यान, रोहित शर्माने स्वतः नाव 'नॉट हिट शर्मा' असं ठेवलं पाहिजे. जर मी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार असतो, तर मी त्याचा प्लेईंग 11 मध्येही समावेश केला नसता, अशी टीका टीम इंडियाचे माजी खेळाडू श्रीकांत यांनी केली होती. त्यानंतर आता रवी शास्त्री यांनी ताशेरे ओढले आहेत. कॅप्टन म्हणून पण रोहितला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाहीये. पाच वेळा मुंबईला चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितने यंदाच्या हंगामात फक्त 5 विजय मिळवून दिलेत.