WTC Final 2023: ईशानची निवड केली पण टेन्शन कायम; 'या' दोन बॉलर्सने वाढवली BCCI ची डोकेदुखी!

IND vs AUS, WTC Final 2023: उमेश यादव (Umesh Yadav) आणि जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) हे दुखापतग्रस्त असल्याची माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आलीये. त्यामुळे आता टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कप जिंकणार तरी कसा? असा सवाल विचारला जात आहे.

| May 08, 2023, 19:46 PM IST

WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात डब्ल्यूटीसीचा (World Test Championship) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघही जाहीर करण्यात आले आहेत. बीसीसीआयने (BCCI) निवड केलेला केएल राहूल (KL Rahul) दुखापतीमुळे सामन्याबाहेर पडला असून त्याच्या जागी आता इशान किशन (Ishan Kishan) याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन कमी झालं. इकडे इशानमुळे दिलासा मिळाला खरा पण दोन गोलंदाजांनी रोहितची धाकधुक वाढलीये.

1/7

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलमध्ये ईशान किशनला संधी देण्यात आलीये. त्यामुळे केएस भरत आणि ईशान किशन हे टीम इंडियाचे दोन विकेटकीपर असतील.

2/7

ईशान किशन याची निवड केल्याची गुड न्यूज देतानाच बीसीसीआयने सर्वांना बॅड न्यूज देखील दिलीये.

3/7

एकीकडे जसप्रीत बुमराह फीट नसताना आता दोन गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याची माहिती बीसीसीआयने मिळाली आहे.

4/7

उमेश यादव आणि जयदेव उनाडकट हे दुखापतग्रस्त असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलीये. त्यामुळे आता टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार तरी कसा? असा सवाल विचारला जात आहे.

5/7

नेटमध्ये गोलंदाजी करताना बाजूच्या दोरीवरून पाय घसरल्याने जयदेव उनाडकटला डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. 

6/7

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स या आयपीएलच्या 36व्या सामन्यात उमेश यादव याच्या डाव्या हाताच्या दुखापत झाल्याने तो सामना खेळत नाहीये.

7/7

उमेश यादव आणि जयदेव उनाडकट हे दोन्ही खेळाडू सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत रिकव्हरी करत असल्याचं दिसतंय.