मुंबई : लखनऊ विरुद्ध राजस्थान सामन्यात असं काही घडलं जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. आयपीएलच्या इतिहासात याची नोंद झाली आणि हे करणारा आर अश्विन हा पहिला खेळाडू ठरला. त्याने एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. त्याच्या निर्णयामुळे संपूर्ण जग हैराण झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान रॉयल्सच्या 19 व्या ओव्हरमध्ये आऊट झालेला नसतानाही त्याने कोणाचीही परवानगी न घेता मैदान सोडलं. त्याच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाज घडलं. ज्याला रिटायर्ड आऊट असं म्हटलं जातं. 


आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळाडू 'रिटायर्ड आऊट'
आर अश्विन IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच रिटायर्ड आऊट होणारा हा पहिला खेळाडू ठरला. जेव्हा फलंदाज कोणतीही दुखापत झाली नसताना अंपायच्या परवानगी शिवाय मैदान सोडतो तेव्हा त्याला रिटायर्ड आऊट म्हणतात. 


अशा परिस्थितीमध्ये आर अश्विनला जर मैदानात परत जायचं असेल तर तो जाऊ शकत नाही. एकदा खेळाडूनं रिटायर्ड आऊट घेतलं की तो पुन्हा मैदानात फलंदाजीसाठी येऊ शकत नाही. 


अश्विन नियमांचा फायदा घेण्यात माहीर 
अश्विन10 व्या ओव्हरमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. 19 व्या ओव्हरमध्ये त्याने रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला. याची कल्पना त्याने कोणालाच दिली नाही. त्याचा पार्टनर शिमरोन हेटमायरला देखील दिली नाही. 


शिमरोन हेटमायरला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला मला याबाबत काहीच माहिती नव्हती. तो थेट क्रीझ सोडून डगआऊटजवळ गेला तेव्हा मला कळलं. पण त्याने जो निर्णय घेतला तो चांगला होता. कारण आर अश्विन खूप थकल्यासारखा वाटत होता असंही शिमरोन म्हणाला. 


पराग क्रिझवर आल्यावर त्याने षटकार ठोकला. आर अश्विननं 23 बॉलमध्ये 28 धावांचं योगदान दिलं. आर अश्विननं असं का केलं याबाबत त्याने कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. पण तो थकल्यामुळे त्याने असं केल्याचा टीममधील खेळाडूंचा अंदाज आहे. 


लखनऊ टीमचा राजस्थानने 3 धावांनी पराभव केला. या रोमांचक विजयानंतर राजस्थान टीमने पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. या सामन्यात आर अश्विननं उत्तम कामगिरी केली. कुलदीप सेनचं विशेष कौतुक होत आहे.