मुंबई : बंगळुरू विरुद्ध चेन्नई आयपीएलमधील 49 वा सामना झाला. या सामन्यात बंगळुरूने 13 धावांनी विजय मिळवला. महेंद्रसिंह धोनीच्या हातून सामना गेल्याने तो संतापल्याचं पाहायला मिळालं. या सामन्याआधी आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी जडेजानं कर्णधारपद सोडलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई टीमसाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. रविंद्र जडेजा आता कुठे तणावातून बाहेर पडून मैदानात उतरत असतानाच त्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात जडेजाला दुखापत झाली. 


फिल्डिंग करताना जडेजाकडून पुन्हा एकदा कॅच सुटला. 17 व्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर कॅच पकडताना जडेजाला दुखापत झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 


रविंद्र जडेजा खांद्यावर पडला. दुखापतीनं तो व्हिवळत मैदानात बसला. त्याने मैदानात डोकं ठेवलं. त्याच्या डोक्यालाही थोडी दुखापत झाली. त्याला पाहण्यासाठी मैदानात फीजियो आले त्यांनी तपासलं आणि त्यानंतर पुढे सामना सुरू झाला. 


रविंद्र जडेजाला जगातील सर्वोत्तम फिल्डर म्हटलं जातं. त्याच्याएवढी उत्तम फिल्डिंग करण्यासाठी खेळाडूंना त्याची उदाहरणं दिली जातात. आता जडेजाला दुखापत झाल्याने चेन्नईचं टेन्शन वाढलं आहे. पुढच्या सामन्यात तो खेळणार की नाही याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती मिळाली नाही.