Ricky Ponting Hospitalized: ऑस्ट्रेलिया (AUS) आणि वेस्ट इंडिज (WI) यांच्यातील पर्थच्या (Perth) मैदानात कसोटी सामना सुरु असताना धक्कादायक घटना घडली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगची (Ricky Ponting) कॉमेंट्री करत असताना अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल (Ricky Ponting Hospitalized) करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिकी पाँटिंगला ह्रदय विकाराचा त्रास (heart attack) होऊ लागल्यानं त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यावेळी सामन्यात तो कॉमेंट्री करत होता. त्यावेळी कॉमेंटरी बॉक्समध्ये पाँटिंग बरोबरच जस्टीन लँगर (Justin Langer) आणि मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) देखील उपस्थित होते. रिकी पाँटिंगला त्रास होत असल्याचं पाहून जस्टीन लँगरला कळालं.


कॉमेंट्री बॉक्समध्ये (Commentary Box) उपस्थित असलेल्या जस्टीन लँगरने वेळेचा भान राखत त्वरित हालचाली केल्यानं रिकी पाँटिंगला वेळेत उपचार मिळवून दिले. लँगरने स्टेडियममधील लिफ्टमधून पाँटिंगला खाली नेलं. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचे डॉक्टर गोल्डिंग यांनी रिकीला तपासलं. पाँटिंगला चक्कर येत होती. त्यानंतर लगेचच रिकीला रुग्णालयात (Ricky Ponting Hospitalized) नेण्याचा निर्णय घेण्यात आला.


आणखी वाचा - Ricky Ponting : लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान रिकी पॉण्टिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल


दरम्यान, रूग्णालयात पॉटिंगच्या ह्रदयासंबंधीच्या काही चाचण्या (Hospital Test) करण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया (AUS) आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी लंच ब्रेक (Lunch break) होण्याच्या ही घटना घडली. काही वेळापूर्वी ठणठणीत असलेला पाँटिंग अचानक कोसळल्याने अनेकांनी धक्काच बसलाय.